ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामुंबई

बलात्कार प्रकरणी आसाराम बापू दोषी- न्यायालय आज शिक्षा सुनावणार


सुरत – एका तरुणीचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी स्वयंघोषित संत आसाराम बापू याला बलात्काराच्या खटल्यात न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आज न्यायालय आसाराम बापूला शिक्षा उणावणार आहे.
२०१३ मध्ये सूरतमधील एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आसाराम बापूवर लावण्यात आला होता. तर, या पीडित तरुणीच्या बहिणीवर आसारामचा मुलगा साई नारायण याने बलात्कार केल्याचा आरोप होता. या प्रकरणात आसारामशिवाय, त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा या आरोपी होता. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आसाराम बापूला कोर्टात व्हर्च्युअली हजर करण्यात आले. सुनावणीनंतर कोर्टाने आसारामला दोषी असल्याचे जाहीर केले. मात्र, शिक्षा उद्या, मंगळवारी सुनावणार असल्याचे जाहीर केले.
सूरत बलात्कार प्रकरणात आसाराम बापूच्या पत्नीसह इतर सहा आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. अहमदाबादमधील चांदखेडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार, आसाराम बापूने २००१ ते २००६ दरम्यान पीडितेवर अनेकवेळा अत्याचार केला होता. ही पीडिता शहराबाहेरील एका आश्रमात वास्तव्यास होती.

error: Content is protected !!