ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

डिलाईरोड मधील श्री लक्ष्मी नारायण व्यायाम शाळेवर थकीत भाडे वसुलीसाठी पालिकेची दांडगाई

मुंबई – मुंबईच्या अनेक भागात परप्रांतीय तसेच बंगलादेशी बेकायदेशीरपणे  राहत आहेत. त्यांच्याकडून पालिकेने कधी भाडेवसुली केल्याचे ऐकिवात नाही वांद्र्यात ३ माळ्याच्या झोपड्या उभ्या राहिल्या त्यांच्याकडून पालिकेने कधी भाडे वसुली केल्याचे ऐकिवात नाही पण डिलाई रोड सारख्या कामगार वस्तीतल्या ९३ वर्ष जुन्या श्री लक्ष्मी नारायण व्यायाम शाळेला  मात्र पालिकेने २१, ४५ ५८५ रुपयांच्या भाडे वसुलीची नोटीस दिली आहे. पालिकेचा हा उफराटा न्याय पाहून परिसरात  व्यायाम प्रेमीची संतापाची लाट उसळली आहे
     मुंबईच्या ना. म. जोशी मार्गावर 1936 पासून  श्री लक्ष्मी नारायण व्यायाम शाळा आहे. पूर्वी पत्र्याच्या शेड मध्ये असलेली हि व्यायाम शाळा २००4  साली तत्कालीन शिवसेना खासदार दिवंगत मोहन रावले यांनी त्यांच्या खासदार फंडातून पक्की बांधून दिली या व्यायाम शाळेत कामगारांची मुले व्यायामसाठी येतात त्यांच्यातून आतापर्यंत अनेक शरीर सौष्टव पट्टू, कबड्डी , क्रिकेट  आणि खोखो पट्टू तयार झाले. अशा या व्यायाम शाळेकडून २०२२ पर्यंत नियमित भाडे भरले जात होते पण २०२२ नंतर पालिकेने भाडे घेणे बंद केले आणि आता २१,४५ ५८५ इतक्या मोठ्या रकमेच्या थकबाकीसाठी नोटीस बजावली आहे.  मग इतके वर्ष जी दक्षिण विभागाच्या मालमत्ता विभागाचे पालिकेचे अधिकारी झोपले होते का ? असा सवाल इथले नागरिक विचारीत आहेत. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही असा इशाराच इथल्या लोकांनी पालिकेला दिला आहे.
      संस्थेचे विश्वस्त आणि पदाधिकारी डॉक्टर विलास वडांबे, दत्ता मांजरेकर, दत्तकुमार सावंत, गणेश शिंदे , किसन जाधव, प्रदीप बरदाडे यांनी याविषयी पालिका आयुक्त भूषण गगराणी, जी_ दक्षिण विभागाची सहाय्यक आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त मालमत्ता तसेच मालमत्ता अधिकारी यांना  पत्र देऊन न्याय द्यावा अशी मागणी केलेली आहे.
         आमदार आणि लोकप्रतिनिधी यांनी या संबंधित व्यायाम शाळेच्या प्रश्नावर लक्ष घालण्याचे  कबूल केले असून याबाबत लवकरच पालिका आयुक्त यांची भेट घेऊन प्रश्न  सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.

error: Content is protected !!