ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

शरद पवारांना यूपीए चे अध्यक्ष करण्यास काँग्रेसचा विरोध

मुंबई/ मोदींना सक्षम पर्याय द्यायला निघालेल्या विरोधकांमध्येच एकी नसल्याचे आता उघडकीस आले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत युपीएच्या अध्यक्ष पदासाठी पवारांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता पण त्याला काँग्रेसने विरोध केला आहे त्यामुळे आता युपीएच्या अध्यक्ष पदावरून विरोधकांमध्ये घमासान सुरू होणार आहे
सध्या ई डी आणि सीबीआय सारख्या तपास यंत्रणांचा वापर करून केंद्र सरकारं विरोधकांना हैराण करीत आहे असा आरोप करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्ष नेत्यांना पत्र लिहून एकत्र येण्याचे आवाहन केले होते . त्यानंतर काही वेळातच युपीएच्या पुनर्बांधणीचा मुद्दा पुढे आला आणि पाठोपाठ युपीएच्या अध्यक्षा पदासाठी पवारांचे नाव पुढे करण्यात आले. सध्या सोनिया गांधी युपीएच्या अध्यक्ष आहेत पण त्यांनी विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी काहीही केलेले नाही असा इतरांकडून आरोप केला जातोय पण काँग्रेसने मात्र हा आरोप फेटाळला आहे उलट सोनिया गांधी यांच्यामुळेच युपीएचे अस्तित्व टिकून आहे असे काँग्रेसचे म्हणणे आहे तसेच इतर राज्यांमधील काही छोट्या पक्षांचा सुधा पवाराच्या नावाला विरोध आहे केवळ ममता ‘अखिलेश चंद्राबाबू हेच नेते पवारांच्या बरोबर आहेत आणि म्हणूनच युपी ए च्या अध्यक्ष पदावरून विरोधकांमध्ये धामासन होणार आहे

error: Content is protected !!