सपातील फुटीर मनोज पांडेला रायबरेलीतून भाजपचे तिकीट ?
लखनौ – लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तिकीट वाटपाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ज्यांना तिकीट मिळालेले नाही अशा नाराजांनी आता पक्षांतर करायला सुरुवात केली आहे. समाजवादी पक्षातून बाहेर पडलेले मनोज पांडे यांनी आज भाजपा नेते अमित शहा यांची भेट घेतली. त्यांना भाजपा कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेली मतदार संघातून, प्रियांका गांधी यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचे समजते .
