ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

माफिया डॉन मुक्तार अन्सारीच्या मृत्यूचे गुढ वाढले


गाझियाबाद/उत्तर प्रदेशातील कुख्यात माफिया डॉन मुक्तार अन्सारी याचा हृदयविकाराच्या झटक्याने बांधा तुरुंगात मृत्यू झाला शनिवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले परंतु त्याच्या मृत्यूचे गुढ आता वाढले असून पाच डॉक्टरांच्या पथकाने त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले कारण मुख्तार अन्सारीला स्लो पॉयझन देऊन तुरुंगात मारण्यात आले असा गंभीर आरोप त्याच्या नातेवाईकाने केला आहे त्यामुळे मुक्तार पोस्टमार्टम ची व्हिडिओ ग्राफी करण्यात आली तसेच त्याच्या मृत्यूची चौकशी करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत मुक्तार अन्सारी बांधा तुरुंगात वेगवेगळ्या कुण्या अंतर्गत शिक्षा भोगत होता चार दिवसांपूर्वी त्याची तब्येत खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिथे त्याच्यावर दोन दिवस उपचार करून पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले पण त्यानंतर शुक्रवारी अचानक त्याला हृदयविकाराचा झटका येऊन तो बेशुद्ध पडला त्यानंतर त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झालाय. शनिवारी त्याच्यावर मोहम्मदाबाद या त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी प्रचंड मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते तसेच उत्तर प्रदेश पोलीस दलातील 5000 पोलीस दीडशे इन्स्पेक्टर साडेतीनशे सब इंस्पेक्टर तसेच एस आर पी कॅपिटेशन फोर्स होमगार्ड असे जवळपास दहा हजार सुरक्षा रक्षक आणि त्या संस्काराच्या वेळी हजर होते मुक्तार अंसारीचा मृत्यू यंदाच्या इलेक्शन मध्ये समाजवादी पार्टी आणि काँग्रेस पार्टीसाठी प्रचाराचा मुद्दा बनू शकतो

error: Content is protected !!