नालेसफाई मध्ये यंदाही कंत्राटदारांची हात सफाईची तयारी 13 ते 29 टक्के कमी दाराच्या निविदा
मुंबई/ नालेसफाईच्या कामात कशा प्रकारे हात सफाई केली जाते हे आता सर्व मुंबईकरांना समजले आहे.यंदाही तोच प्रकराहे मोठी नदी आणि इतर मोठ्या नाल्यांच्या सफाई साठी यंदा पालिका132 कोटी40 लाख खर्च करणार आहे.पण आश्चर्याची गोष्ट अशी की यां पालिकेची निविदा प्रक्रिया नेहमी प्रमाणे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे . कारण कंत्राटदारांनी 13 ते 29 टक्के कमी दराने काम करण्यास तयारी दर्शवली आहे .त्यामुळे कंत्राटदार येवढे उदार का झाले ? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.पून्हा थुक पट्टीचा प्रत्यतर नाहीना! कारण कुठलाही नुकसान करून सरकारचा फायदा करीत नाही.आणि पालिकेचे कंत्राटदार तर नाले सफाईबाबत बदनाम आहेत मग कमी दारात काम करण्याची त्यांची का इच्छा आहे याची चौकशी करण्याची मागणी मुंबईकर जनता करीत आहे