ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

राज ठाकरे- आशिष शेलार भेट


मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची सांगत झाल्यानंतर विधानपरिषद निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यामुळे, निवडणुकांमधील आरोप-प्रत्यारोप, राजी-नाराजीपासून काही वेळासाठी दूर झालेली राजकीय मंडळी पुन्हा विधानपरिषद निवडणुकांसाठी सज्ज झाली. त्यामुळे, पुन्हा एकदा महायुती व महाविकास आघाडीतील शीतयुद्ध समोर आल्याचं दिसून आलं. त्यातच, भाजप महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर करण्यात आला. मनसेनं अभिजीत पानसे यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यामुळे महायुतीत पुन्हा वादंग होतं की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
आशिष शेलार यांनी आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये कोकण आणि मुंबई पदवीधर मतदार संघातील निवडणुकीसंदर्भात झाली चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे, कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार नेमका कोणाचा असेल, याची चर्चा रंगली आहे. कारण, मनसेने कोकण पदवीधर मतदान संघासाठी अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यातच, आता राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

error: Content is protected !!