ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

अखेर डाव साधला-उद्धव ठाकरेचा राजीनामा

एका म्यानात दोन तलवारी राहूच शकत नाहीत.हिंदुत्वाचे सुधा तसेच होते.हिंदुत्वाला भाजपने आपली मक्तेदारी समजायला लागल्यापासून हिंदुत्वात दोन वाटेकरी असावेत हे भाजपला तेंव्हाही मान्य नव्हते आणि आताही नाही आणि नेमकी हीच गोष्ट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लक्षात आली नाही.त्यामुळे भाजपला जवळ करताना याच भाजपमध्ये भविष्यात कधीतरी आपल्या शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल याची पुसटशी सुधा बाळासाहेबांना किंवा त्यांच्या सोबत असलेल्या शिवसेना नेत्यांना कल्पना नव्हती.पण अखेर बाळासाहेबांच्या पश्चात भाजपच्या काव्याने शिवसेनेचा घात केला.शिवसेना फुटली आणि शिवसेनेला सतेतून घालवण्याचा भाजपने डाव साधला असे आता शिवसैनिकच म्हणत आहेत.पण राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा मित्र अथवा कायमचा शत्रू नसतो आज भाजपने शिवसेना फोडली उद्या भाजप सुधा फुटेल आणि तिसऱ्याच कोणाचे तरी राज्य येईल .कारण करावे तसे भरावे ही म्हणच आहे.मनसेचे नगरसेवक फोडून त्यांच्या हातावर शिबांधन बांधताना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत होता तोच चेहरा आज निराश आणि वैफल्यग्रस्त दिसत आहे . दुसऱ्याच्या घराला सुरुंग लावल्यावर त्या माणसाला काय वेदना होतात ते आज उद्धव ठाकरे याना कळले असेल.पण राजकारणात या गोष्टी होताच असतात . कारण आजचा राजकारणी महाराष्ट्र हा शरद पवारांचा आहे.त्यामुळे इथे फक्त आणि फक्त बेरजेचे राजकारण चालणार.आज शिवसेना पूर्णपणे अल्पमतात आहे अशावेळी सतेसाठी राष्ट्रवादी भाजप सोबत जाणार नाही किंवा एकनाथ शिंदेंना जवळ करणार नाही याची कुणीही शास्वती देणार नाही.पावरांसाठी राजकारणात कुणीही अस्पृश्य नाही.काल पर्यंत उद्वव ठाकरे सोबतीला होते . उद्या कदाचित फडणवीस किंवा एकनाथ शिंदेंची सोबत लाभेल काय फरक पडणार आहे. कारण लोकांना या सर्व घाणेरड्या प्रकारांची आता सवय झालीय.त्यामुळे राजकारणात लोकांना इंटरेस्ट राहिलेला नाही.त्याच बरोबर लोक निवडणुकी पर्यंत काहीही लक्षात ठेवत नाहीत.आज बघतात उद्या विसरून जातात सता कोणाची आहे त्यांना कशी मिळाली याच्याशी लोकांना काहीच घेणेदेणे नाही .कारण लोक राजकारण्यांचे गुलाम बनलेले आहेत पूर्वी 150 वर्ष गोऱ्या इंग्रज लोकांची गुलामी केली आता काळया इंग्रज लोकांची गुलामी करीत आहे त्यामुळे गुलाम हे शेळ्या मेंढ्या प्रमाणे असतात त्यांना हाकणारां ज्या दिशेने त्यांना घेऊन जाईल त्या दिशेने या शेळ्या मेंढ्या नी जायचे मग त्यांना हाकणारा पडळकर असो की जानकर असो ! शेळ्या मेंढ्या मुक्या असतात अस्तित्वहीन असतात आज या देशातील जनतेची अशीच शेळ्या मेंढ्या सारखी अवस्था आहे म्हणून तर राजकारण्यांचे फावले आहे.

एकनाथ शिंदे यांचे बंड हे फार मोठं शाध्यांत्र आहे आणि त्याची तयारी अनेक महिन्यांपासून सुरू होती शिवाय या बंदला कोणाची फूस होती हे स्वतः शिंदे यांनीच कबूल केले आहे . कारण या बंडाची सूत्रे भाजपा कडून हलवली जात होती बंडखोरांना सुरतला नेऊन तेथून गोहतीला हलवणे आणि तिथे पंचतारांकित हॉटेल मध्ये त्यांची बडदास्त ठेवणे त्यासाठी प्रत्येक आमदारावर दिवसाला 8 लाख रुपये खर्च करणे हे सर्व वाटत तितकं सोपं नाही.आणि अनपेक्षित सुधा नाही लोकांना माहीत होते की या सर्वांच्या मागे कोण आहे आणि शेवटी सर्व तयारी झाल्यावर भाजपने आपल्या चेहऱ्यावरचा बुरखा काढलं आणि राज्यपालांची भेट घेऊन बहुमत चाचणी करण्याची मागणी केली .शिवसेनेचे किंवा महाविकास आघाडीचे जे काही व्हायचे असेल तर होईल पण या निमित्ताने भाजप काय चीज आहे याची केवळ महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला प्रचीती आली आहे. आज उद्धव ठाकरेना राजीनामा द्यायला भाग पाडले तेव्हा शिंदेंनी सावध राहावे अन्यथा त्यांच्या रिक्षाचे एकही चाक जाग्यावर राहणार नाही .
.

error: Content is protected !!