ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महापालिकामहाराष्ट्र

उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त व उपमहापौर यांच्यात रंगला वाद . उपमहापौराने केले उपोषण .

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेला लाभलेले आय ए एस दर्जाचे आयुक्त हे अकार्यक्षम असुन त्यानी शहरा साठी कोणते ही काम केले नाही . ते पत्रकाराना भेटत नाहीत . ते नगरसेवकाना भेटत नाहीत फक्त आपल्या खास मर्जितील लोकाना भेटतात. त्यानी शासनाने पाठवलेल्या चार उपायुक्ताना आपल्या मर्जिप्रमाणे विभाग दिले आहेत अशा आयुक्ताना इथे राहण्याचा कोणता ही अधिकार नाही. त्यानी स्वताहुन जावे या मागणी साठी उल्हासनगर चे उपमहापौर भगवान भालेराव . नगरसेवक व गलिच्छ वस्ती निर्मुलन समितीचे सभापती प्रमोद टाले व नगरसेवक मंगल वाघे यानी आयुक्तांच्या दालना बाहेरच एकदिवशीय उपोषण करुन आयुक्तांच्या मनमानी कारभाराचा निषेध केला आहे . तर शेवटी आयुक्तानीच कोरडे आश्वासन देवुन उपोषण मागे घ्यायला लावले आहे .

उल्हासनगर महापालिकेत शासनाच्या वतीने आय ए एस दर्जाचे असलेले डॉ . राजा दयानिधी याना गेल्या वर्षी आयुक्त म्हणुन पाठवले असुन त्यानी शहरातील कोविड प्रादुर्भाव कमी करण्यावर भर देण्या ऐवजी ते आपले कार्यालय सोडत नव्हते. तर आता पर्यंत ते एकदा ही पत्रकाराना भेटले नाही . दरम्यान ते फक्त आपल्या खास मर्जितील नगरसेवकाना व खास लोकाना भेटत होते . शासनाने पहिल्यांदाच चार उपायुक्त महापालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठवले आहेत तेव्हा महापालिकेतील विभागातील कामे आयुक्तानी वाटप करुन दिले आहेत . त्यावर उपमहापौर भगवान भालेराव यानी आक्षेप घेत उपायुक्ताना सेवा ज्येष्टते प्रमाणे खाते वाटप करायला पाहिजे होते . असा आरोप भालेराव यानी केला आहे . तर हा प्रशासकिय प्रश्न असुन तो माझ्या अखत्यारित आहे कोण्या अधिकाऱ्याला कोणते खाते द्यायचे तेव्हा आपण या प्रश्नी लक्ष न देण्याचे पत्र आयुक्त डॉ . राजा दयानिधी यानी भगवान भालेराव याना दिले होते . मात्र भालेराव यांचे समाधान झाले नाही. तेव्हा काल ते सरळ आयुक्तांच्या दालना बाहेरच उपोषणाला बसले . त्यांच्या सोबत आर पी आय चे नगरसेवक मंगल वाघे .पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष व गलिच्छ वस्ती निर्मुलन समितीचे सभापती प्रमोद टाले हे देखिल उपोषणाला बसले होते . दरम्यान यांच्या उपोषणाला आमदार कुमार आयलानी . नगरसेवक राजेश वधारिया . राजेश वानखडे . भाजपाचे गट नेते जमनू पुरस्वानी . महेश सुखरामानी . प्रकाश माखिजा . सौ अर्चना करनकाळे प्रदिप रामचंदानी यानी भालेराव यांच्या उपोषणाला पाठींबा दिला आहे . मात्र आयुक्तानी भालेराव याना कोरडे आश्वासन देवुन आमदार कुमार आयलानी यांच्या मध्यस्थीने उपोषण सोडले आहे . दरम्यान हे आयुक्त खरोखरच अकार्यक्षम असुन महापालिकेतील वादग्रस्त अधिकारी भदाणे यांचे सर्व कागदपत्रे बोगस असताना त्याचा जन्म दाखला खोटा . त्याची पी एच डी बोगस हे सर्व लेखी पुराव्या सह महापालिकेत सादर असताना त्या भदाणेवर हे निष्क्रिय आयुक्त कारवाई करत नाहीत म्हणजेच हे आयुक्त कुठे तरी भ्रष्टाचाराला खत पाणी घालत आहेत . म्हणुन अशा आयुक्तानी शासनाच्या आदेशाची वाट न बघता स्वताहुन काढता पाय घेतला पाहिजे असे येथिल नागरिकांचे मत आहे .

error: Content is protected !!