ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

परहित चॅरिटेबल ट्रस्ट कडुन पुरग्रस्ताना राशन वाटप

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर विधान सभा क्षेत्रातील कांबा गांवात आलेल्या पुरामुळे येथिल नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन त्यांचे सर्व गृहपयोगी वस्तु वाहुन गेल्या आहेत . तेव्हा उल्हासनगर येथिल परहित चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता यानी कांबा गांवातील शेकडो पुरग्रस्त नागरिकाना जीवनावश्यक वस्तु सह राशन वाटप करुन एक सामाजिक बांधिलकी जपली आहे .

गेल्या आठवड्यात आलेल्या मुसळधार पावसाने कांबा गावात १५ फुटा पर्यंत उल्हासनदीचे पाणी शिरुन शेकडो नागरिकांचे संसार वाहुन गेले आहेत . तेव्हा त्या पुरग्रस्त नागरिकाना मायेचा एक आधार म्हणुन उल्हासनगर येथिल परहित चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता यानी त्या पुरग्रस्त शेकडो नागरिकाना जीवनावश्यक वस्तु सह राशन वाटप केले आहे . या वेळी राहुल गुप्ता . संतोष पोळ . आनंद गुप्ता . दिपक बागुल . संजय कांबळे यानी सहकार्य केल असुन कांबा गांवातील त्या पुरग्रस्त नागरिकानी विशालकुमार गुप्ता यांच्या कार्याची प्रशंसा करत आभार मानले आहे .

error: Content is protected !!