ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेठाणे

धक्कादायक!परप्रांतीय फेरीवालयाचा महिला पालिका अधिकारावर हल्ला; तीन बोटे छाटली


ठाणे/ परप्रांतीय फेरीवालयाकडून चिरीमिरी घेऊन त्यांना अभय देणे किती भारी पडू शकते याचा प्रत्यय काल ठाणे महापालिका प्रशासनाला आलाय.कारण काल एका फेरीवालयाने सहाय्यक पालिका आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर कोयत्याने हल्ला करून त्यांची तीन बोटे छाटली या घटनेने केवळ ठानेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून त्या फेरीवालयाचा अटक करण्यात आली
ठाण्याच्या माजिवडा परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर फेरीवाले बसतात त्यापैकी काहीजण पालिका कर्मचाऱ्यांना तर काही स्थानिक गुंडांना हप्ते देतात.त्यामुळे पालिका अधिकारी त्यांच्यावर कारवाई करायला गेले तरी ते तेथून हटत नाहीत. उलट अधिकाऱ्यांना अरेरावी करतात काल असेच झाले पालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पीता पिंपळे या त्यांच्या पथकासह सादर ठिकाणी कारवाई करण्यास गेल्या आता फेरीवाले व त्यांच्यात वाद झाला यावेळी अमरजीत यादव नावाच्या भाजीवल्याने कल्पित पिंपळे यांच्यावर कोयत्याने हल्ला केला यात त्यांची तीन बोटे तुटली तर त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा अंगरक्षक मध्ये येताच त्याच्याही हातावर अमरजीत वर केला यात त्याचे एक बोट तुटले या घटनेनंतर ठाण्यात मोठी खळबळ माजली आरोपीला पोलिसांनी अटक केली असून जखमी कलपिता व तिच्या अंग्रक्षकला ठाण्याच्या वेदांत हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दखल करण्यात आले आहे या घटनेनंतर ठाणेकर रस्त्यावर उतरले व मुजोर फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत काही फेरीवाल्यांना त्यांनी मारहाणही केल्याचे समजते

error: Content is protected !!