कोरोनाचे संकटाने मंदी; तरीही गणेशोत्सवाची तयारी! जागरणातील जुगाराची प्रथाही संपुष्टात येणेची चर्चा
!
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- सध्या सर्वत्र १० दिवसावर येवुन ठेपलेल्या गणेशोत्सव सणाकडे सर्वांचे डोळे लागुन राहीले आहेत. मोठ्या उत्साहाने या वर्षाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेकांची लगबग सुरु आहे. मात्र सध्या कोरोनाची तिसरी लाट येणेची चर्चा जोरदार सुरू असल्याने या सणावर भीतीचे व आर्थिक मंदीचे प्रंचड सावट आहे. असे असतानाही सर्वत्र गणेशभक्त सध्या हा उत्सव साजरा करण्याची जोरदार तयारी अनेकजण करीत आहेत. काही गणेशभक्तांनी तर बाजारातील ही भिषण परिस्थिती बदलावी तसेच कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी गणेशाला याकडे घालणार आसल्याचे सांगितले आहे. दरम्यान गेल्या वर्षी आणि यावर्षीही कोरोनाची भीती आणि आर्थिक गोचीमुळे आता हळुहळु गणपती जागरणासाठी जुगार खेळण्याची प्रथा पैसे नसल्याने संपणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान गेल्या काही महीन्यापासुन कोरोनाचे मोठे संकट असल्याने बाजारात उद्योग धंदे बंद पडल्याने प्रंचड आर्थिक मंदी पसरली आहे. आता कोरोना गेल्यानंतर पुन्हा बाजारात तेजी येण्याचे संकेत वर्तविले जात आहेत. त्यामुळे येथे भिषण मंदी असतानाही अनेकांनी प्रॅापर्टी राखुन ठेवली आहे. मात्र आणखीन काही काल ही मंदी अशीच राहील्यास येथे स्वस्तात जमिनी विकायला लागण्याची दुर्दवी वेळ अनेकांवर येणार असल्याची भीती अनेकजणांकडुन व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षाचा मानाने यावर्षी कोरोनाची तिसरी लाट यणार असल्याचे संकेत असल्याने कोरोनाचे अधिक सकंट गणेशोत्सवावर आहे. त्यातच बाजारातील अनेक उद्योग धंदे अनेक दिवस बंदच होते. परीणामी बाजारात प्रंचड आर्थिक मंदीचे सावट आहे. त्यातच महागाईचा आलेखही दिवसेदिवंस वरवरच चढत आहे. त्यामुळे या महागाईने अनेकांचे कंबरडे येथे मोडले आहे. असे असतानाच हिंदु संस्क्रुतीत ढीगभर प्रत्येक महीन्यात काहींना काही सण आहेत. काही सण साजरे करणे शिवाय अनेकांसमोर अनेकदा पर्यायही नसतो. त्यामुळे अशाच प्रकारे आता यावर्षीचा गणेशोत्सव सण साजरा करणे कित्येक जणांसाठी क्रमप्राप्त असल्याने अनेकांची येथे हा उत्सव साजरा करणेसाठी अनेकजणांची धावपळ सुरु असल्साचे येथे गणेशभक्त सांगत आहेत.
विशेष म्हणजे आता केवल १० दिवसावरच गणेशोत्सव सण आला आहे. तो साजरा करणेस गणेशभक्त सज्ज झाले आहेत. गणरायाचे आगमणाचे स्वागत येथे वाजत गाजत गणेशभक्तांकडुन करणेत येणार आहे. तर महागाईने त्रस्त असलेले काहींनी हा गणेशोत्सव कर्ज काढुन साजरा करावा लागणार आहे, तसेच यावर्षी प्रंचड मंदी गणेशोत्सव दरम्यान आहे, त्यामुळे पैसेच नसल्याने गणपती जागरणासाठी रात्री जुगार खेळण्याची प्रथा आपोआपच संपुष्टात येणार असल्साचे सर्वत्र बोलले जात आहे. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवात पोलिसंवरील बंदोबस्त वगळता ईतर ताण कमी होणार असल्याचे चित्र दिसत आ्हे.
दरम्यान काही गणेशभक्त तर प्रंचड कडकीतच यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करणार आहेत, असे सांगत आहेत. तर कोरोनाने मंदी असतानाही आणि गणेशोत्स डोक्यावर असतानाही येथे गणेशभक्त कोणतेही टेंशन घेत नसुन करणार सावरणार सर्व तो आहे, असे सांगत बोट वर करीत आहेत. त्यामुळे गणराय सर्व आपल्या पाऊलांनी घेवुन येतील आणि गणेशोत्सव साजरा होईन असा विश्वास अनेकांना आसल्साचे सांगितले जात आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्स साजरा करण्याची तयारी जोरदार सर्वत्र सुरु आहे. अनेक गणेशघाटही गणपती विसर्जनासाठी सज्ज करणेत येत असल्याने पुन्हा एकदा गणेशोत्सव येथे कोरोनाचा भितीचा आणि आर्थिक मंदीचा सावटाखाली पार पडणार आहेत.