ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामुंबई

ठाण्याच्या टिपटाॅप प्लाझामध्ये जुगार्‍यांनी मांडला पत्त्याचा डाव.

ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे युनिट-५ ने टाकलेल्या छाप्यात १९ जुगारी ताब्यात

ठाणे :- हॉटेलमधील दोन रूममध्ये जुगाराचा अड्डा थाटल्याचा प्रकार ठाण्याच्या टिपटॉप प्लाझामध्ये समोर आला. या छाप्यात १९ जुगार्‍यांना ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे युनिट ५ ने ताब्यात घेतले असून याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एलबीएस रोडवरील टिपटॉप प्लाझामध्ये जुगारी पत्ते कुटत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे युनिट ५ ला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ५चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने याठिकाणी छापा मारला. यावेळी हॉटेलच्या दोन वेगवेगळ्या रूममध्ये अनुक्रमे १० व ९ जुगारी पत्ते खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या जुगार्‍यांना ताब्यात घेत तब्बल आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.

error: Content is protected !!