ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

पुढील काळात एक नविन चळवळ मुख्यमंत्री शिंदे च्या रूपाने महाराष्ट्रात उभी होत आहे.- भवानजी

मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी म्हणाले की मी अनेक दिवसापासून भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय भाग घेत आहे. भारत काही घराण्याच्या तावडीत सापडलेला दिसतो , सामान्य माणसाला राजकारणात भाग घ्यायचा असेल तर घेऊ शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणूनच जो भारतातला टॅलेंट आहे, अत्यंत हुशार माणस आहेत, अत्यंत कर्तबगार माणस आहेत ते राजकारणामध्ये टिकू शकत नाही ,जे पक्षाचे नेते आहेत. त्यांना निष्ठावंत लोकांची किंमत नाही. त्यांना पैसेवाले पाहिजेत मग तो गुंड असू देत का चोर असू देत कारण .. राजकारणाला धंदा केला आहे. जशी नेत्यांना निष्ठावंताची गरज नाही तशी निष्ठावंतांना सुद्धा नेत्यांची गरज नाही. म्हणूनच राजकारणात उलथापालथ होत आहे. जसे ज्योतिरादित्य शिंदेवर काँग्रेस ने प्रचंड अत्याचार केले. त्यांना अशी परिस्थिती आणली की त्यांना पक्षातून जवळ जवळ हाकलून काढले. पंजाब मुख्यमंत्र्यांना निवडणुकीच्या तोंडावर काढले. ते पुढे जावून, भाजप बरोबर गेले आणि काँग्रेस संपली. बंगाल मध्ये ममता बॅनर्जी ला काढले. असे काँग्रेसच्या अधोगतीचे अनेक उदाहरणं मी देवू शकतो ,: तीच गत शिवसेनेची झाली. निष्ठावंतांनी चिरडले,– तिथून निष्ठावंतांनी निर्णय घेतला आणि लोकप्रिय असl एकनाथ शिंदे हे तळागाळातील कार्यकर्ते आहेत, अत्यंत सामान परिस्थितीतून ते शिवसेनेत आले आणि प्रचंड कष्ट केले , अडचणीच्या काळात त्यांनी शिवसेना वाढवली, फक्त मुंबई ठाण्यामध्ये नाही तर ग्रामीण भागामध्ये त्यांची नाळ जोडली आहे, ते प्रचंड मेहनती आहेत व सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, शिंदे साहेबांसोबत अनेक खासदार आमदारांनी काम करायला सुरू केले, यांच्यामध्ये अतिशय कर्तबगार लोक आहेत , उद्धव ठाकरे पेक्षा जास्त आमदार शिवसेनेचे शिंदे साहेब बरोबर आहेत त्याअर्थी लोकशाहीच्या गणिताप्रमाणे शिंदे साहेबांचा पक्ष हे खरी शिवसेना आहे असे सर्वम्हणतआहे ,लोकशाहीमध्ये कुठलाही पक्ष कुणाची खाजगी प्रॉपर्टी असू शकत नाही. लोकांनी निवडून दिलेला आमदार ज्यावेळेला निर्णय घेतात त्यावेळेला तो निर्णय हा खरा निर्णय असतो, निवडून आलेला आमदार खासदार वरच कायदे बनतात आणि विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये मांडले जातात. बहुमत नसले तर हे निर्णय मानले जाऊ शकत नाही ,. कुठलाही पक्ष नेत्याच्या मालकीचा नसतो. त्यातील नेते, आमदार व खासदार यांचा असतो. म्हणून जे दावा करतात हे आम्ही कुणाला मंत्री बनवले, कुणाला भरपूर काही दिले, हे वक्तव्य बरोबर नाही.. म्हणजे तुम्ही स्वतःला मालक समजत आहात. आमदार, खासदारांना गुलामासारखे वागवतात. मग आमदार, खासदारांना हे मान्य होत नाही., … तेव्हा त्यांना तुमच्या पासून दूर होण्याचा पूर्ण अधिकार आहे
आमदार जर समूह निर्णय घेतात तर तोच खरा पक्ष मानला जातो. ज्या अर्थी शिवसेनेमध्ये बहुतेक आमदार शिवसेना सोडून गेले त्याअर्थी बहुतेक आमदारांचा विश्वास नेत्यावरचा उडून गेला. आणि म्हणून जसा विश्वासाचा ठराव मांडला जातो त्याचप्रमाणे हा एक आयुष्याचा ठराव समजून तो मान्य केला पाहिजे. पुढच्या काळामध्ये जर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य आमदार खासदार कार्यकर्ते उभे राहिले तर खऱ्या अर्थाने शिवसेना पक्ष हा त्यांचा समजला जाऊ शकतो हे पण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. बहुसंख्य कार्यकर्ते, आमदार, खासदार जर कुठच्या एका बाजूला दिसले तर ते चिन्ह त्यांना मिळायला पाहिजे अशा प्रकारची भावना लोकांमध्ये आहे , …..हीच खरी लोकशाही आहे...
या सर्व राजकीय पक्षापेक्षा महत्त्वाची जनता असते आणि जो जनतेला खरा न्याय देऊ शकतो, जो जनतेचे काम करू शकतो त्यांनीच नेतृत्व केले पाहिजे असा अट्टाहास लोकशाहीमध्ये आपण ठेवू शकतो. कामाच्या बाबतीत शिंदेसहेबांचा हात कुणीही धरू शकत नाही. रात्रं आणि दिवस शिंदे साहेब लोकांना उपलब्ध असतात. छोट्या पासून मोठ्या पर्यंत सर्वांना भेटतात. लक्ष देतात. व लोकप्रतिनिधींच महत्व टिकवतात. त्यामुळे त्यांना भेटायला प्रचंड गर्दी उसळते. तरी ते अत्यंत उत्साहाने सर्वांना भेटतात हे त्यांचे ‘वैशिष्ट्य’ आहे. त्यामुळे जनतेबद्दल आणि राज्याबद्दल त्यांना पूर्ण प्रेम आहे. ते कुठल्याही चमचावर किंवा एजंटवर अवलंबून राहत नाही,म्हणून एक लोकाभिमुख असा नेता बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्राला मिळालेला आहे. त्या भावनेतून बरीच लोक त्याच्या पाठीशी उभे राहिले आहे.,

error: Content is protected !!