पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता
कोलकत्ता/कोलकत्याच्या आरजीकर रुग्णालयात महिला डॉक्टर वर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी कलकत्त्यामध्ये भाजपा विरुद्ध तृणमूल त्काँग्रेस यांच्यात जो हिंसक संघर्ष सुरू आहे त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे .म्हणूनच गुरुवारी भाजपाच्या शिष्टमंडळाने पश्चिम बंगालचे राज्यपाल एस व्हीं आनंद यांची भेट घेतली आणि आता तुम्हीच काहीतरी या प्रश्नावर करा अशी त्यांना विनंती केली त्यानंतर राज्यपाल कोलकत्यातील सर्व हिंसक घटनांबाबतचा अहवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून देणार आहे .त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने केलेल्या आंदोलनाच्या विरोधात भाजपच्या महिला आघाडीनेही आंदोलन केली तसेच महिला आघाडीने पश्चिम बंगाल राज्य महिला आयोगाच्या कार्यालयालाही घेराव घातला त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळलेली आहे.