मालवण मधील राड्या प्रकरणी ४२ जणांवर गुन्हा दाखल
मालवण/बुधवारी ठाकरे गट आणि राणे समर्थ यांच्यामध्ये राजकोट किल्ल्याजवळ जो राडा झाला होता त्याप्रकरणी मालवण पोलिसांनी दोन्हीकडच्या ४२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे दरम्यान या घटने प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा माफी मागितलेली आहे तसेच लवकरात लवकर त्याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाईल मात्र यावर कोणी राजकारण करू नये असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले
मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याचे आता सर्वच लोक राजकारण करीत आहेत याच राजकारणाचा एक भाग म्हणून सत्तेत सामील असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने गुरुवारी सर्वत्र मुक आंदोलन केले तसेच शुक्रवारी स्वतः अजितदादांनी मालवणला भेट देऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली तर हा पुतळा ज्या शिल्पकाराने बनवला होता त्या जयदीप आणि चेतन वर गुन्हे दाखल करण्यात आले असून हे दोघेही पळाले असले तरी जयदीपच्या पत्नीची पोलिसांनी चौकशी केली आहे त्याचबरोबर पुतळ्या भोवतालचे सुशोभीकरणाचे काम ठाकरे गटाचे स्थानिक आमदार यांच्या सहकाऱ्यांनी केले होते आरोप त्यामुळे याप्रकरणी त्यांची ही चौकशी केली जाणार आहे