ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिका

लसीचे दोन डोस घेऊनही त्यांना कोरोनाणें गाठले के ई एम च्या २२ वैद्यकीय विद्यार्थ्यांना करोना

मुंबई/ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या देशभर मोठ्या प्रमाणावर मोफत लसीकरण मोहीम राबवली जात आहे मात्र लसीचे दोन डोस घेऊनही के ई एम मधल्या २२वैद्यकीय विद्यार्थ्यांना करोना झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून या सर्वांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत .या घटनेनंतर सरकारची चिंता वाढली असून मास्क वापरण्या बाबत कुणीही हलगर्जीपणा करू नये तसेच सरकारने जी नियमावली आखून दिली आहे तिचे काटेकोरपणे पालन करावे असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले .
करोना काळात दिवस रात्र रुग्णालयात करोना पेंशट वाचवण्यासाठी झटणाऱ्या अनेक डॉक्टरांना यापूर्वी प्राण गमवावे लागले आहेत.मात्र कोरोनावरील लस आल्यानंतर काहीसा दिलासा मिळाला होता साध्य संपूर्ण देशात वेगाने लसीकरण सुरू असून आतापर्यंत ५५कोटी लोकांना लसीचा पहिला तर २७ कोटी लोकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आले .मात्र लसीचे दोन डोस घेऊनही काही लोकांना पुन्हा करोनाची लागण होत असल्याने लोक लसीच्या विश्वर्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. करोता विरुद्धच्या लढाईत आघाडीवर असलेल्या के ई एम रुग्णालय आणि सेठ वैद्यकीय महाविद्यालयातील २२ विद्यार्थ्यांना दोन दिवसांपूर्वी कोरॉनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे हे सर्व वैद्यकीय विद्यार्थी एम बी बी एस च्या दुसऱ्या वर्षातील आहेत त्यांना दोन तीन दिवसांपूर्वी ताप येऊ लागल्याने त्यांची तात्काळ आर टी पी सी आर टेस्ट करण्यात आली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने मोठी खळबळ माजली त्यानंतर त्यांना तात्काळ मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .यापूर्वीही दोन डोस घेतलेल्या काही डॉक्टरांना करोताची लागण झाली होती मात्र या घटनेने सरकारची चिंता वाढली आहे मात्र लसीकरण मोहीम अधिक तीव्रतेने राबवली जाणार आहे तसेच मास्क आणि इतर नियमांचे पालन न करणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई केली जाणार आहे

बॉक्स/ करोनाचा धोका पुन्हा वाढल्याने शाळांबाबत प्रश्नचिन्ह
येत्या ४ऑक्टोबर पासून शाळा सुरू होणार होत्या पण लसीचे दोन डोस घेऊनही २२वैद्यकीय विद्यार्थ्यांना करो ना झाल्याच्या घटनेने पालकांची भीती वाढली आहे त्यामुळे आता ४ तारखेपासून शाळा सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा फेरविचार होण्याची शक्यता आहे

error: Content is protected !!