शिंदेंच्या ठाण्यात रश्मी ठाकरेंचे शक्तिप्रदर्शन
ठाणे/ शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील राजकीय संघर्ष विकोपाला गेलेला असतानाच काल उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन टेंभी नाका नवरात्रोत्सवाच्या देवीचे दर्शन घेऊन आरती केली यावेळी हजारो शिवसैनिक आणि सेनेच्या महिला कार्यकर्त्या हजार होत्या सेनेने या ठिकाणी एक प्रकारे शक्तिप्रदर्शन केले
दिवंगत आनंद दिघे यांनी टेंभी नाक्यावर सुरू केलेल्या नवरात्रोत्सवात दरवर्षी ठाकरे कुटुंबीय देवीच्या दर्शनासाठी जात असते.पण यावेळी शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे भाजप सोबत गेले आणि त्यांनी सरकार स्थापन केले त्यामुळे शिंदेंच्या बाले किल्ल्यातील देवीच्या दर्शनाला ठाकरे कुटुंबिय येणार की नाही याबाबत सर्वांना उत्सुकता होती पण काल संध्याकाळी रश्मी ठाकरे टेंभी नाक्यावर आल्या यावेळी सेनेचे हजारो कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या देवीच्या मंडपा समोर वाट पहात होत्या त्यानंतर रश्मी ठाकरे आल्या यावेळी उपस्थित शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत त्यांचे स्वागत केले त्यानंतर रश्मी ठाकरे यांनी देवीची आरती केली यावेळी त्यांच्या सोबत सेनेच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी,सेनेचे ठाण्यातील खासदार राजन विचारे,आनंद दिघे यांचे भाचे केदार आदी संह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हजार होते .त्यानंतर त्या आनंद दिघे यांच्या समाधी स्थळी जाऊन त्यांनी दर्शन घेतले आणि तेथून त्या भांडुप येथील संजय राऊत यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली .