ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

माझ्या विरोधातील फायलींवर आर आर आबांनी सही केली – अजित पवार यांचा गौप्यस्फोट


मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात आता प्रचाराची रणधुमाळी जसजशी वाढत आहे, तसतशा आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या वाढणार आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज सांगलीतील तासगाव येथे सभा पार पडली. या सभेत अजित पवार यांनी राज्याचे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. आर. आर. पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांची उघड चौकशी व्हावी, या फाईलवर सही केली, असा मोठा आणि अतिशय धक्कादायक आरोप अजित पवारांनी केला. विशेष म्हणजे आपण आर. आर. आबांना अनेकदा कठीण प्रसंगात मदत केली. पण त्यांनी आपल्या विरोधातील चौकशीच्या फाईलवर स्वाक्षरी केली. याचं आपल्याला खूप वाईट वाटल्याचं अजित पवारांनी आज भर सभेत सांगितलं.
मी प्रत्येक वेळेस आबांना आधार दिला, प्रत्येक वेळेस मदत केली. मला एका गोष्टींचं वाईट वाटतं. तो मला म्हणाला की, माझं गृहखातं काढून घेतलं, मला गृहखातं पाहिजे. अमूक पाहिजे तमूक पाहिजे. सर्व दिलं. माझ्याबरोबर २०२४ ला बीट लावली होती की, २०२४ ला काँग्रेस पक्षा राष्ट्रवादीच्या जास्त जागा लावणार. त्यावेळी स्कोडा गाडीची शर्यत लागली होती. काँग्रेस पेक्षा जास्त जागा निवडून आल्या तर नवी कोरी स्कोडा गाडी देणार. आल्यावर त्याने मला सांगितलं. आपण शब्दाचे पक्के. जास्त जागा निवडून आल्यावर नवी स्कोडा सुपर गाडी त्याच्याघरी पाठवली. उपकार केले नाहीत. पैज लावली होती ती त्याने जिंकली. या पद्धतीने प्रत्येक वेळेस आधार दिला”, असं अजित पवार म्हणाले. काळात आजार झाला. आम्हाला खोटं सांगितलं की, गाल सुजले. पण डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. मी त्याला राजाराम बापू करखान्याच्या कार्यक्रमात तंबाखू खाऊ नको, असं सांगितलं होतं. त्याच्यावर टीका केली होती. लोकांना कॅन्सर होतात. साहेबांनाही तो आजार झाला होता. त्यामुळे गप्प बस राव. आपल्याला खूप काम करायचं आहे. मी नसलो की, गुपचूप तंबाखू चोळायचे आणि मी असलो की कुठे दादा काही नाही. पण मी माझ्याकरता सांगत नव्हतो तर मी त्याच्याकरता सांगत होतो”, असं अजित पवार म्हणाले.

error: Content is protected !!