ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

एस टी संपात प्रवाशांचा काय दोष ?


गेल्या २० दिवसांपासून महाराष्ट्रात जो एस टी कामगारांचा संप सुरू आहे तो प्रवाशांसाठी अन्यायकारक आहे अशावेळी सरकार आणि संपकरी आप आपल्या भूमिकेवर ठाम राहणार असतील तर आता प्रवाशांनाच या दोघांच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागणार आहे.एस टी कामगारांना पगार कमी आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या पगारवाढीच्या मागणीसाठी संप आणि आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण विलीनीकरणाच्या मागणीवर अडून बसणे कितपत योग्य आहे. विलीनीकरण हा विषय न्याय प्रविष्ट आहे आणि न्यायालयाच्या आदेशा विलीनीकरणाच्या मागणीवर अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे अशावेळी या समितीचा जो काही अहवाल येईल तो स्वीकारण्याची सरकारची तयारी असताना एस टी कामगार संप का सुरू ठेवीत आहेत? बरे विलीनीकरण बाबत समितीचा अहवाल येईपर्यंत सरकारने अंतरिम पगारवाढ सुधा देऊ केली आहे तरी सुधा संपकरी जर ऐकणार नसतील तर त्यातुंत्यांचेच नुकसान आहे कारण अगोदरच औद्योगिक न्यायालयाने हा संप बेकायदेशीर ठरवला आहे .तसेच उच्च न्यायालयाने सुधा संप मागे घ्या असे अनेक वेळा आवाहन करूनही संपकरी एकयला तयार नाहीत म्हणजे न्यायालयाच्या पेक्षाही संपकरी मोठे झाले आहेत का ? हा देश संविधनावर चालतो दादागिरी वर नाही याचे एस टी कामगारांना भान असायला हवे.देशात लोकशाही शासन प्रणाली नुसार न्यायपालिका अंतिम आहे त्यामुळे न्यायालयाचे आदेश हवेत.आणि न्यायालय कधीच कोणाचे नुकसान करणार नाही .मात्र आज सरकार,न्यायपालिका आणि प्रवासी सुधा संपकरी एस टी कामगारांवर नाराज आहेत त्यांच्या या नाराजीचा आज ना उद्या एस टी कामगारांना मोठा फटका बसू शकतो.राहता राहिला सवाल बिर्याणी करण्यचा ! तर महाराष्ट्रात एस टी सारखी अनेक महामंडळे आहेत जर आज एस टी चे शासनात विलीनीकरण केले तर उद्या इतर महामंडळाचे कर्मचारी याच मार्गाने सरकारला ब्लॅक मेल करू लागतील मग त्यांचे काय करायचे? एवढ्या सगळ्या महामंडळांच्या कामगारांना शासनाच्या सेवेत सामावून घेऊ इतपत सरकारची आर्थिक स्थिती आहे का ? सरकारवर साडेचार लाख कोटींचे कर्ज आहे त्यामुळे जे आहेत त्याच सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार देताना सरकार ची हालत खराब झालीय पैसा नसल्यामुळे अनेक योजना पाडून आहेत अशा स्थितीत महामंडळांच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कसे सामावून घेणार? बरे एस टी महामंडळ तोट्यात आहे. कामगारांचे पगार देण्यासाठी एस टी डेपो आणि ड्रायव्हर सुधा भाड्याने देण्याची एस टी महामंडळावर वेळ आली होती मग सतत तोट्यात असलेल्या एस टी महामंडळाला शासकीय सेवेत कसे सामावून घेणार? एस टी महामंडळ तोट्यात असतानाही सरकारने अंतरिम का होईना पगारवाढ दिली आहे तरी सुधा विलकरण्याची मागणीसाठी अडून बसणे योग्य नाही.एस टी कामगारांनी कधीतरी प्रवाशांचा सुधा विचार करायला हवा आज एस टी चां प्रवासी हा ग्रामीण भागातील गरीब शेतकरी,शेतमजूर किंवा शहरात जाऊन मिळेल ते काम करणारा गरीब मजूर आहे पण एस टी संपामुळे तो आज घरी बसलाय त्याची पोरेबाले उपाशी मारत आहेत. तो आणि त्याचे कुटुंबीय एस टी कामगारांना शिव्याशाप घालीत आहेत त्यांचा आक्रोश घेऊ नका.सांपकर्यानी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जर सरकारने उद्या एस टी चे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला तर तुम्ही काय करणार? संप चालवायला काय वाटतं नाही पण त्याच्या परिणामाचा सुधा विचार करायला हवा.संपकर्याना जे पाठींबा देण्यासाठी आझाद मैदानावर जे पुढारी मोठमोठ्या बढाया मारत होते ते शेवटी पळालेणा! पुढारी लोकांचे हे असेच असते तुम्ही लढा आम्ही कपडे सांभाळतो आणि लढाईत जेंव्हा पराभव दिसू लागतो तेंव्हा पुढारी मागच्या दाराने कधी सटकलेले असतात त्याचा पत्ता लागत नाही.हा आजवरचा इतिहास आहे .खोत आणि पडळकर यांच्या पक्षाचे मोठे नेते जरी संपाला पाठींबा देत असेल तरी कामगारांना जास्त ताणू नका असा सल्लाही देत आहेत .त्यामुळे हे असे लोक तुमच्या सोबत किती दिवस राहतील याचा विचार करा .आजवरणेक मोठ्या पुढाऱ्यांनी संप केले को.डांगे,शांती पटेल,जॉर्ज फर्नांडिस,शरद राव, डॉ.दत्ता सामंत या लोकांनी कधीही संप तुटे पर्यंत ताणून धरले नाही. कारण कामगारही जगला पाहिजे आणि तो कामगार ज्या कारखान्यात पोट भरतोय तो कारखानाही चालू राहिला पाहिजे असे या संपकरी नेत्यांचे धोरण होते.म्हणून ते कामगार नेते यशस्वी झाले.केवळ गिरणी कामगारांच्या संपात अपयश आले त्यालाही करणे आहेत गिरणी कामगार सुधा एस टी कामगार प्रमाणेच हट्टाला पेटले होते .डॉ. सामंत त्यांना सांगत होते की कापड उद्योगात राष्ट्रीय मिल मजदुर संघ ही एकमेव मान्यताप्राप्त युनियन आहे आणि सरकार फक्त त्यांच्याशीच बोलणार त्यामुळे मिल मालक किंवा सरकार आपल्याशी वाटाघाटी करणार नाही म्हणून तूर्तास माघार घेऊया असे डॉ सामंत कामगारांना समजावत असतानाही संपकरी एकले नाही त्याचा फायदा मिल मालकांना झाला त्यांनी संपतील नुकसानीचे कारण पुढे करून टाळेबंदी करायला सुरुवात केली आणि मुंबईची शान असलेला २लाख गिरणी कामगार उध्वस्त झाला घरदार विकून त्याला मुंबई सोडावी लागली. एस टी कामगारांनी मिलच्या संपातून आणि गिरणी कामगारांच्या बरबदितून धडा घ्यावा त्यातच त्यांचे हित आहे

error: Content is protected !!