भायखळा परिसरात विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन
मुंबई- महापालिका ई प्रभाग तर्फे विशेष स्वच्छता मोहीम यांचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमे अंतर्गत भायखळा, माझगाव, सातरस्ता मधील मार्केट ,स्टेशन, शाळा परिसर स्वच्छ करण्यात आला. सोबत परिसरातील जनतेचे प्रबोधनही करण्यात आले. या मोहिमेस पालिका उपायुक्त संगीता हसनाळे आणि सहाय्यक आयुक्त सुरेश सागर यांच्या मार्गदर्शना खाली राबविण्यात आले. यामध्ये पालिका घनकचरा विभागाचे सहाय्यक अभियंता रंजन बागवे , दुय्यम अभियंता सुशांत रत्नपारखे, सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक शेखर बांगर, कनिष्ठ अवेशक, पर्यवेक्षक आणि स्वच्छता कर्मचारी यांनी सहभाग घेतला. या मोहिमेला परिसरातील नागरिकांनी उस्फूर्त पाठिंबा देऊन पालिका कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले.