ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

एकनाथ शिंदे ची नाराजी कायम महायुतीत खाते वाटपावरून तीव्र मतभेद


मुंबई/राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बाप्पा यश मिळाले मात्र असे असतानाही मुख्यमंत्री ठरवण्याबाबत तब्बल एक आठवडा उलटून गेला तरी निर्णय झालेला नाही दिल्लीत एकनाथ शिंदे अजित पवार आणि अमित शहा यांच्यात झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांचे नाव घोषित केले जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु भलेही देवेंद्र फडणवीस यांचे नाव नक्की झालेले असले तरी अजून त्याबाबतची घोषणा झालेली नाही त्यातच मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाले असून ते त्यांच्या दरे गावी जाऊन बसले आहेत त्याचबरोबर मंत्रिपदाबाबत महायुतीमध्ये तीव्र मतभेद असल्याचे समोर आले आहे
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारला तयार नाहीत मात्र त्यांच्या पक्षाचे काही वरिष्ठ नेते शिंदेनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे यासाठी दबाव टाकीत आहे त्यामुळे शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याची शक्यता आहे परंतु त्यांना महत्त्वाची खाती हवेत खास करून गृहमंत्री गटाला हवे आहे तर भाजप मात्र त्यांना गृहमंत्री पद द्यायला तयार नाही मंत्रिमंडळातील दुसरे महत्त्वाचे पद म्हणजे अर्थ खाते त्या अर्थगाते अजित पवार यांना मिळणार आहे परंतु नगर विकास महसूल ग्रामविकास गृहनिर्माण यासारख्या महत्त्वाच्या आणि मलाईदार खात्यांवरून वाद सुरू आहे यातील काही मलाईदार खाती शिंदे गटाला हवी आहेत तर काही मलाईदार खाती अजित पवार गटाला हवी आहे परंतु भाजपाकडून मात्र शिंदे गट आणि अजित पवार गट या दोन्ही घटना प्रमुख खाती द्यायला विरोध आहे आणि त्यावरच सध्या चोर बैठका सुरू आहे यातून निश्चितपणे काहीतरी मार्ग निघेल असे भाजपच्या नेत्यांना वाटते मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर खातेवाटप ही सुरळीत होईल असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे डिसेंबरला शपथविधी होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच खाते वाटपात कुणाच्या वाट्याला काय आले ते कळून शकेल

error: Content is protected !!