विधानसभेच्या सभापतींच्या विरोधात अविश्वासाचा ठराव
नागपूर – हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून विरोधकांनी त्यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दिला आहे त्यामुळे आज शेवटच्या दिवशी सभागृहात हंगाम होण्याची शक्यता आहे
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात राजकारण चांगलंच तापलं आहे. आता महाविकास आघाडीकडूनविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यासंदर्भात मविआकडून विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र सोपवलं आहे. काँग्रेसचे सुनील केदार,शिवसेनेचे सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर,अनिल पाटील यांनी हे पत्र सचिवांना दिलं आहे.
सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांना सभागृहात बोलण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळं विरोधी पक्षांकडून नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव देण्यात आला आहे. विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे हे पत्र दिलं आहे. ज्यावर महाविकास आघाडीच्या 39 आमदारांच्या सह्या आहेत. महाविकास आघाडीच्या आमदारांना सभागृहात बोलून दिलं जात नसल्यानं मविआनं हे पाऊल उचललं असल्याचं समजत आहे.
याच नाराजीतून विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस विधिमंडळ सचिवांना देण्यात आलेली आहे. आता या प्रस्तावाबाबत पुढचा निर्णय काय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. असं असलं तरी भाजप आणि शिंदे गटाकडे बहुमत असल्यानं प्रस्ताव आणला तरी तो मंजूर होण्याची शक्यता मात्र कमीच आहे.
नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरुवातीपासूनच वादळी ठरत असल्याचं दिसून येत आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद, राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य, अब्दुल सत्तारांवरील आरोप, आदित्य ठाकरेंचा मुद्दा अशा विविध विषयांनी अधिवेशन गाजलं आहे. अशात विरोधकांना बोलण्याची संधी मिळत नसल्यानं पहिल्या दिवशीपासून नाराजी आहे