ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

मुंबई जनसत्ताच्या दणक्याने ग्रॅन्टरोड मधील फेरीवाल्यांवर कारवाई होणार – सहायक आयुवत शरद उघडे यांचे आश्वासन

मुंबई- फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईच्या दयनीय अवस्थेबाबत मुंबई जनसत्ताने अनेक वेळा आवाज उठवलेला आहे. काही दिवसांपूर्वी ग्रॅन्टरोड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला असलेल्या फेरीवाल्यांच्या विरोधात असाच आवाज उठवलेला होता .अखेर महापालिकेच्या सहायक आयुक्त शरद उघडे यांच्या कडे  या बेकायदेशीर फेरीवाल्यांची कारवाई करण्यासाठी  मुंबई जनसताने  बातमी द्वारे मागिणी केली असता . बातमीची दखल घेत पालिका डी प्रभागाचे अतिक्रमण निर्मुलन अधिकारी मोरे यांना कारवाईचा आदेश दिल्याचे समजते .
          या अतिक्रमणीत फेरीवाल्यांमुळे ग्रांटरोड रेल्वे स्थानकातून सकाळ संध्याकाळच्या वेळेला ये जा करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना खूप त्रास होतोय . शिवाय या रस्त्यावर वाहतूक कोंडी व्हायची परिणामी स्टेशन मधून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना टॅक्सी मिळत नव्हती. कारण काही फेरीवाले रस्त्यातच बसायचे मात्र हा सगळं प्रकार मुंबई जनसत्ताने उघडकीस आणल्यानंतर आता मात्र या रस्त्याने मोकळा श्वास घेणार आहेत .
      .फेरीवाल्यांचा वाढता शिरजोरीपणा –
  बेकायदा फेरीवाले आणि स्टॉल यांच्याकडे अतिक्रमण निर्मूलन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे फेरीवाले शिरजोर झाले आहेत  . याबाबत मागील सहा महिन्यापासून मुंबई जनसत्ता बेकायदा फेरीवाल्यांच्या विरोधात बातमीद्वारे आघाडी उघडली आहे.
          आता मुंबईतील इतर रेल्वे स्थानकाच्या बाहेर ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यानाही पालिकेने हटवावे अशी मागणी मुंबई जनसत्ताने केली आहे .

   कर्मचारी व्यस्त –
    प्रभागातील सहाय्यक आयुक्त शरद उगाडे यांनी दिलेल्या आदेशाची आणि कारवाईची माहिती घेण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन अधिकारी मोरे यांच्याकडे गेले असता त्यांनी कारवाई करणार असल्याची माहिती मुंबई जनसत्ताला दिली . परंतु ही कारवाई आत्ता चाललेल्या पंतप्रधान फेरीवाला मदत योजनेच्या कामकाजामुळे  पालिका कर्मचारी व्यस्त असल्यामुळे दिरंगाई होत असल्याचे सांगितले .

स्टॉल लायसन्स अधिकारी कधी जागे होणार –
ग्रँड रोड स्टेशन बाहेर स्टॉल धारकांनी अतिक्रमणकरणाचा बाजार मांडून जनतेला वेटीस धरला आहे .पालिकेकडून ज्या व्यवसायाचा परवाना असताना दुसराच व्यवसाय करून नियम भंग मोठ्या प्रमाणात केले आहे . याबाबत स्टॉलचे पालिका अधिकारी आपली जबाबदारी झटकून इतर खात्यांकडे बोट  केली जात आहे .स्टॉल लायसन्स अधिकारी कधी जागे होणार हा खरा प्रश्न आहे त्यांची जबाबदारी त्यांना कळत नसेल तर प्रभागातील सहाय्यक आयुक्त  शरद उघडे यांनी फैलावर घेणे गरजेचे आहे .

        मुंबई जनसत्ताला दिनांक 29 12 22 रोजी बाटलीवाला नावाच्या फेरीवाल्यांकडून फोन आला त्याने फेरीवाले गरीब असल्याचे आणि तुमच्या बातमीमुळे अन्याय होत असल्याचे रडगाणे गाऊन बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तर फेरीवाल्यांकडून होणाऱ्या दादागिरी बाबत मात्र जाब विचारला असता तो निरोत्तर झाला .

error: Content is protected !!