थर्टी फर्स्ट साजरी करणाऱ्यांनो सावधान मुंबईत १४४ कलाम लागू-१ कोटींची बनावट दारू जप्त
मुंबई – शनिवारी वर्षाचा अखेरचा दिवस म्हणजे थर्टी फर्स्ट आहे त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी संपूर्ण मुंबईत पार्ट्या आयोजित करण्यात आल्या आहेत . पण दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबईत १४४ अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यासाठी मुंबईत ६ अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शन खाली जवळपास १० हजारांचा पोलीस फौजफ़ाटा तैनात आहे. यावेळी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांची खैर नाही त्यामुळे थर्टी फर्स्ट साजरी करणार्यांनी सावधानी बाळगण्याची गरज आहे
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाची सुरुवात अतिशय जल्लोषात आणि दिमाखात करण्यासाठी सध्या सर्वजण सज्ज झाले आहेत अनेकांनी पर्यटनस्थळांवर गर्दी केली आहे, तर काहींनी मुंबईत येत या शहरातूनच 2022 या वर्षाला निरोप देण्याचं ठरवलं आहे. तुम्हीही थर्टीफर्स्ट म्हणजेच 31 डिसेंबर 2022 ला मुंबईत असाल, तर काही नियमांचं पालन मात्र नक्की करा. कारण, मुंबई पोलिसांकडून शहरात१४४ कलम लागू करण्यात आलं आहे. त्यामुळं आता थर्टीफर्स्ट कसा साजरा करायचा असाच प्रश्न या शहरातील नागरिकांना पडू लागला आहे.
मुंबई पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार 31 डिसेंबर 2022 ते 29 जानेवारी 2023 पर्यंत हे नियम लागू असणार आहेत. यामध्ये प्रामुख्यानं फ्लाईंग कंदिल वापरणं, विक्री करणं आणि ते सोबत बाळगणं या मानवी जीवनाला धोका उदभवू शकतो. किंबहुना शहरातील शांतता आणि सुव्यवस्थाही भंग होऊ शकते ज्यामुळं सावधगिरी बाळगत कलम 144 मधील अधिकारान्वये त्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं तुम्हीही जर ला आकाशकंदिल सोडण्यच्या बेतात असाल तर सावध ‘