ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

बायकोच्या रागाने पोलिसाचा आत्मदहनाचा प्रयत्न


नगर/ बायकोच्या रागाने एका पोलीस कर्मचाऱ्याने थेट नगर पोलीस अधक्षकांच्या कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला सुदैवाने तिथे ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टलला.
जितेंद्र उर्फ हरिभाऊ मांडगे हे शिक्रापूर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार पदावर कार्यरत आहेत त्यांच्या विरुद्ध सुपे पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी पत्नीचा छळ आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा २०१८ मध्ये दाखल झाला होता. शिवाय पती पत्नीचे पटत नसल्याने त्यांच्या घटस्फोटाच्या दाव्यावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. असे असताना ७ जानेवारी २०२२ रोजी हरिभाऊ मांडगे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. मात्र हा गुन्हा खोटा असल्याचा मांडगे यांचा दावा आहे. मात्र यातून वारंवार होणार्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्मदहन करून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला त्यानंतर शनिवारी सायंकाळी ते रॉकेलचा डबा घेऊननगर पोलीस अधीक्षक कार्यालयात आले. आणि एका अधिकायाच्या दालनात जाऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र तेथे ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याचं हातून रॉकेलचा दाबा काढून घेतला . यावेळी मांडगे मोठमोठ्याने आरडओरड करू लागल्याने पोलीस कर्मचारी तेथे गोळा झाले .त्यानंतर उप अधीक्षक अनिल कातकाडे यांनी त्यांची समजूत काढली आणि त्यांना भिंगर पोलिसांच्या ताब्यात दिले .या घटनेची माहिती पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या नंतर पोलीस अधीक्षकांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यानुसार मांडगे यांच्यावर भिगर कॅंप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!