जनतेला दिलासा सीएनजीच्या दारात कपात
मुंबई -महागाईमुळे बजेट बिघडलेल्या मुंबईकरांना महानगर गॅसने मोठा दिलासा दिला आहे. आज मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २ . ५० रुपयांची कपात होणार आहे. महानगर गॅसने याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आधीच महागाईत होरपळणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा दिला आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर जाहीर होणार आहेत.
मुंबई आणि आसपासच्या शहरात सीएनजीच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एक किलो सीएनजीसाठी आता अडीच रुपये कमी मोजावे लागणार. आज मध्यरात्रीपासून नवीन किंमती नुसार८७ रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीचे दर हे४४ टक्क्यांनी स्वस्त असल्याचा दावा महानगर गॅसने केला आहे.
मुंबई आणि जवळील परिसरात महानगर गॅस लिमिटेड ही कंपनी प्रमुख सीएनजी, पीएनजी गॅस वितरक आहे. त्यामुळे सीएनजी गॅसच्या दर कपातीचा मोठा फायदा कार चालकांपासून ते रिक्षा चालकांनादेखील होणार आहे. सीएनजीच्या दरवाढीमुळे अनेकांचे बजेट बिघडले होते. या दरकपातीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
सीएनजीच्या किमतीत वाढ झाल्यामुळे, सीएनजी वाहनांच्या वापरामुळे ग्राहकांची पेट्रोल-डिझेलच्या तुलनेन खर्चात जास्त बचत होत नाही. सीएनजी आणि पेट्रोल-डिझेलच्या दरात फारसा फरक राहिला नव्हता. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी होती. त्याच्या परिणामी चालू आर्थिक वर्षात व्यावसायिक वाहनांमध्ये सीएनजीचा वापर कमी झाला असल्याचे समोर आले होते.