विरोधी पक्षाच्या १४६ खासदारांचे निलंबन मागे
नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवरून गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांच्या निलंबित १४६ खासदारांना बुधवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाग घेता येणार आहे. गेल्या अधिवेशनात विक्रमी संख्येने १४६ खासदार निलंबित झाले होते. त्यापैकी मागील अधिवेशनाच्या काळापुरते निलंबित झालेल्या खासदारांना उद्यापासून अधिवेशनात सहभागी होता येणार आहे. उर्वरित 11 राज्यसभा खासदारांना विशेषाधिकार समितीने दोषी ठरल्याची माहिती आहे. परंतु उपराष्ट्रपतींनी आपले अधिकार वापरून त्यांचे निलंबन रद्द केले आहे. त्यामुळे सर्व खासदार अधिवेशनात सहभागी होऊ शकणार
बुधवार , ३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी गेल्या अधिवेशनात निलंबित करण्यात आलेल्या सर्व खासदारांचे निलंबन रद्द करण्यात येत आहे. हिवाळी अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेच्या १४६ खासदारांना निलंबित करण्यात आले होते.
विओधी पक्षांच्या १४६ पैकी १३२ खासदारांना केवळ हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले होते, त्यामुळे हे निलंबन पुढील अधिवेशनात म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपोआप संपुष्टात आले आहे. उर्वरित १४ खासदारांना विशेषाधिकार समित्यांनी त्यांचा निर्णय होईपर्यंत निलंबित केले होते.
१४ खासदारांपैकी 3 लोकसभेचे आणि ११ राज्यसभेचे होते. त्यांची प्रकरणे लोकसभेच्या विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आली असून समितीचा निर्णय होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने ११ जानेवारी रोजी लोकसभा खासदारांचे निलंबन रद्द केले. मंगळवारी राज्यसभेच्या खासदारांचे निलंबन रद्द करण्यात आलं.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहातून १४६ खासदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यापैकी १३२ खासदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. त्याचवेळी विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत लोकसभेच्या तीन आणि राज्यसभेच्या११ खासदारांना निलंबित करण्यात आले होते..