ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

उत्तर प्रदेशातील उमेदवार दिल्याने काँग्रेस नेते नाराज – राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेस मध्ये क्रॉस व्होटिंग होणार?


मुंबई/ शिवसेना आणि भाजपने एक एक उमेदवार जादा दिल्यामुळे अगोदरच राज्यसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले आहे त्यात आता काँग्रेसने उत्तर प्रदेशातील उमेदवार पडल्याने काँग्रेसचे नेते आणि आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे परिणामी काँग्रेस कडून क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे
राज्यसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस मधून संजय निरुपम मिलिंद देवरा मुकुल वासनिक आदी नेते इच्छुक होते पण त्यांना डावलून उत्तर प्रदेशच्या प्रतापगड मधील उर्दू कवी इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी देण्यात आली इम्रान हे काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष आहेत .शिवाय त्यांनी 2019 मध्ये मुरादाबाद मधून लोकसभेची निवडणूक लढवली होती अशा माणसाला तिकीट दिल्याने काँग्रेस मध्ये नाराजी असून क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे विधानसभेत काँग्रेसचे44 आमदार आहेत .निवडून येण्यासाठी 42 मतांची गरज आहे त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार सहज निवडून येवू शकतो पण आमदार नाराज असल्याने काय होईल सांगता येत नाही

error: Content is protected !!