ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

घोडेबाजार अटळ


राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 जागांसाठी 7 उमेदवार मैदानात उतरले आहेत त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार अटळ आहे.आणि या घोडेबाजार अपक्षांची अक्षरशः दिवाळी आहे.आता अपक्ष आमदारांवर करोडोंची बोली लागेल त्याची मते विकली जातील आणि हे हरामखोर राजकीय पुढारी एखाद्या आजारी माणसाला चार पैशाची मदत करणार नाहीत .एखाद्या गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी चार पैसे देणार नाहीत पण आता अपक्ष आमदार खरेदी करण्यासाठी तिजोऱ्या खोलून बसतील आणि खुलेआम जसा बैल बाजार भरतो तसा बाजार भरेल.अशा पद्धतीच्या निवडणुका घेऊन या लोकांनी लोकशाहीला कामाठीपुरा मधल्या कोठ्यावर बसवले आहे. विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक तर भाजपचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात असे असताना शिवसेनेने दोन तर भाजपने 3 उमेदवार उभे केले आहेत.एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 42 मतांची आवश्यकता असते शिवसेनेकडे 56 आमदार आहेत त्यात पहिल्या उमेदवाराला 42 मते गेल्यावर 14 मते उरतात त्यानंतर राष्ट्रवादीचे 54 आमदार आहेत त्यांच्या उमेदवाराला 42 मते गेली की त्यांच्याकडे 12 मते उरतात काँग्रेसचे 44 आमदार आहेत त्यामुळे त्यांच्या उमेदवाराला 42 मते गेली तर त्यांच्याकडे फक्त 2 मते उरतात महाविकास आघाडी म्हणून विचार केला तर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिघांकडे मिळून 28 मते शिल्लक राहतात मग या 28 मतांवर शिवसेनेचा दुसरा उमेदवार कसा निवडून येईल त्यामुळे शिवसेनेला संजय पवार यांना निवडून आणण्यासाठी घोडेबाजार करावाच लागणार आहे तीच स्थिती भाजपची आहे भाजपकडून 105 आमदार आहेत त्यामुळे त्यांचे दोन उमेदवार सहज निवडून येतील मात्र तिसऱ्या उमेदवारासाठी फक्त 21 मते शिल्लक राहत आहेत या 21 मतांवर तिसरा उमेदवार निवडून येऊ शकतं नाही त्यामुळे घोडेबाजार करावाच लागेल . आता 29 अपक्षापैकी किती महाविकस आघाडी कडे जातात आणि किती भाजपला मदत करतात हे याची गोळाबेरीज आणि लेन देन चा हिशोब सध्या सुरू आहे.कोणाला किती द्यायचे याची गणित मांडली जात आहेत.आणि अशा सौदागराच्या मागे आम्ही बोंबलत फिरतोय

या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या लोकांनी पद्धतशीरपणे गेम केल्यानंतर आता आपापले उमेदवार मैदानात उतरवले आहेत.आणि हे उमेदवार मैदानात उत्रवत असताना एकमेकांना शह काटशह कसा देता येतं येईल याचीही गणिते मांडली आहेत . शिवसेनेने राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देताच भाजपने तिसऱ्या उमेदवाराच्या रूपाने कोल्हापूरच्या च धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे आता संजय पवार विरुद्ध धनंजय महाडिक यांच्यात मोठी चुरस आहे.कोल्हापुरात खुटा बळकट करण्यासाठी सेना भाजपचा आप आपल्या अरीने जो प्रयत्न सुर आहे ते पाहता ही राज्यसभेची निवडणूक म्हणावी कोलाहपुरची कुस्ती म्हणावी तेच कळत नाही.अर्थात ते काही असो अपक्षांचे भले होणार असेल तर अशा निवडणुका रोज व्हाव्यात असेच अपक्षणा वाटत असेल .

error: Content is protected !!