ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

ज्यांनी देशाचा गौरव वाढवला त्या पहिलवानांवर जिंकलेली पदके गंगार्पण करण्याची पाळी आलीय

हरिद्वार : देशातील दिग्गज कुस्तीपटूंचं गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरु आहे. या कुस्तीपटूंनी खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. पण सरकारकडून खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्यामुळे हे खेळाडू आज चांगलेच आक्रमक झाले. सरकारने आपल्या आंदोलनाची दखल घ्यावी यासाठी हे कुस्तीपटू थेट हरिद्वारला गंगा तिरावर दाखल झाले. त्यांनी आपली सर्व पदकं गंगा नदीच्या पात्रात विसर्जित करण्याचा निर्णय घेतलेला. त्यासाठी ते आज संध्याकाळी गंगा तिरावर दाखलही झाले.

यावेळी या खेळाडूंना अश्रू अनावर झाले. ते खूप ढसाढसा रडू लागले. या खेळाडूंनी खूप मेहनत करुन पदकं जिंकली आहेत. पण आज आपल्याला ही पदकं गंगा नदीत विसर्जित करावी लागत असल्याने ते भावूक झाले. या आंदोलनात अनेक कुस्तीपटू सहभागी झाले होते. यावेळी काही शेतकरी नेत्यांनी मध्यस्थी केली. त्यांनी या खेळाडूंना समजवण्याचा प्रयत्न केला. असं केल्याने न्याय मिळणार नाही, उलट मेहनतीने कमावलेली पदकं नदी पात्रात विसर्जित होतील. त्यामुळे वेगळ्या मार्गाने लढा सुरु ठेवा, असं आवाहन करण्यात आलं.

शेतकरी नेत्यांनी केलेलं आवाहन कुस्तीपटूंनी मान्य केलं. त्यामुळे शेतकरी नेत्यांना या कुस्तीपटूंची समजूत काढण्यात यश आलं. कुस्तीपटूंनी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय. तसेच ते गंगा तिरावरुन परतले आहेत. त्यांनी आपली पदकं गंगा नदी पात्रात विसर्जित करण्याचा निर्णय मागे घेतल्याने अनेक नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. कारण हे खेळाडू आणि त्यांनी कमावलेले पदकं हे देशाचे अभिमान आहेत. त्यामुळे त्यांनी मेहनत करुन कमावलेले पदकं नदी पात्रात सोडू नये, अशी संपूर्ण देशाची इच्छा होती

error: Content is protected !!