ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्रमुंबई

डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणच्या श्रीसदस्यांची महाड पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम

घाटकोपर ता 31 , बातमीदार-डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण रेवदंडा यांच्या माध्यमातून सोमवार पासून पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत महाड , पोलादपूर व चिपळून या ठिकाणी दररोज 1500 हुन अधिक श्रीसदस्य विविध ठिकाणाहून स्वच्छता अभियानात सामील होत आहेत. महाड मध्ये पाण्याचा प्रवाह शिरल्याने गाळ , माती , चिखल , कचरा , वाहने , घरातील वस्तू , किराणा दुकानातील माल हा वस्तीत व रस्त्यावर पसरलेला आहे. या सर्व वस्तू उचलण्यापासून ते रस्त्यावरती साचलेला गाळ यांची विल्हेवाट लावण्यासाठी पूरग्रस्त भागामध्ये स्वच्छता अभियानाचे नियोजन प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी (पद्मश्री पुरस्कार सन्मानित ) तसेच प्रतिष्ठाणचे विश्वस्त रायगड भूषण श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. महाड येथील पूरग्रस्त भागात महाड जिल्हा परिषद शाळा , ग्रामपंचायत , आयटीआय , रुरल हॉस्पिटल समोरील ट्रामा केअर सेंटर , महाड एसटी स्थानक , बिरवाडी , चवदार तळे , आंबेडकर स्मारक आदी ठिकाणी मुंबई उपनगरातून आलेल्या श्रीसदस्यांनी स्वच्छता केली. या मोहिमेत प्रतिष्ठाणचे श्रीसदस्य स्वतःचा जेवणाचा डबा , पाण्याची बॉटल , तसेच सॅनिटायझर , मास्क यांचा वापर करत पूरग्रस्त भागात स्वच्छतेचे काम करत आहेत. डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण रेवदंडा मार्फत सातत्याने समाजउपयोगी उपक्रम राबविले जातात. त्यात प्रामुख्याने वृक्ष लागवड आणि त्याचे संवर्धन , आरोग्य शिबीर , रक्तदान शिबीर , दाखले वाटप , शैक्षणिक साहित्य वाटप , अंध व मुखबधिर विद्यार्थाना मदत , उद्योजकता व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर , पाणपोई बसथांबे , आपतग्रस्तांना मदत यासारखे अनेक उपक्रम राबविले जातात. 20 जुलैच्या महापुराने झालेली अस्वच्छता संपूर्ण स्वच्छ करण्यासाठी प्रतिष्ठाणने नियोजन केले आहे. या अभियानासाठी महाड नगर परिषद पोलादपूर व चिपळूण प्रशासनाने सहकार्य केले आहे. प्रतिष्ठाणचे हे स्वच्छता अभियान पूरग्रस्त भाग पूर्णपणे स्वच्छ होई पर्यंत सुरूच राहणार आहे.

error: Content is protected !!