ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

केरळच्या व्हयनाडमध्ये भूसखल्न १२३ जणांचा मृत्यू १५० जखमी

कोची – आतापर्यंत १२३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी दिली आहेमृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय
बचावकार्यादरम्यान जवळपास २५० लोकांना वाचवण्यात आलंय. तसंच, किमान १६३ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं, “सध्या दरडीखाली अडकलेल्या लोकांचा एकूण आकडा सांगता येणं शक्य नाही. दुर्घटनाग्रस्त भागात चहाचे मळे असून दरड कोसळल्याने त्या भागात हेलिकॉप्टरही उतरण्यास अडचणी येत आहेत.”
दुर्घटनाग्रस्त भागातील एका चहाच्या मळ्यात सुमारे १५० कुटुंबे राहत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
अग्निशामन दल, एनडीआरएफ, कन्नूर डिफेन्स कॉर्प्स आणि नौदलाचे हेलिकॉप्टर्स बचावकार्य करत आहेत. या दुर्घटनास्थळी असलेला पूल कोसळल्यानं आणि मुसळधार पावसामुळे बचावकार्यात काहीसे अडथळे येत आहेत.
दरड कोसळलेल्या भागात पोहोचण्यासाठी सुरक्षा दलाला एक तात्पुरता पूल तयार करण्यास सांगण्यात आलंय. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या मुख्यमंत्री कार्यालयानं ही माहिती दिलीय.चूराल्लमाला ते मुंदाक्काई आणि अट्टामाला भागाला जोडणारं पूलही कोसळल्यानं बचावकार्याच्या मोहिमेत अडथळे निर्माण होत आहेत.

error: Content is protected !!