ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिकेतील भ्रष्टाचाऱ्यांना कोरोणच्या तिसऱ्या लाटेच्या निमित्ताने आर्थिक पर्वणी मलिद्यासाठीच नव्या जंबो कोविड सेंटरचा खटाटोप

मुंबई/ पंतप्रधान मोदी कधीतरी म्हणाले होते की माणसाला पुढे जायचे असेल तर संकटात सुधा संधी शोधायला हव्यात.आज सेना भाजपचे भलेही भांडण सुरू असेल तरी पंतप्रधान मोदींचा अमूल्य सल्ला पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने शिरसावंद्य मानून कोरॉनाच्या संकटकाळात सुधा कुठे कुठे कसा कसा हात मारता येईल याकडेच अधिक लक्ष केंद्रित केलेले आहे.आणि त्याचेच जिवंत उदाहरण महालक्ष्मी रेस्कोर्स येथे नव्याने बांधण्यात येत असलेले ४४कोटींचे जंबो कोविड सेंटर! मुंबईतील जंबो कोविड सेंटर अगोदरपासूनच वादाच्या भोवऱ्यात आहेत. खुद्द गंभीर आरोप झाल्याने महापौर आणि मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात चांगलीच जुंपली होती.आणि हा सगळा तमाशा मुंबईकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं होता त्यामुळे मुंबईत तयार होणाऱ्या नव्या कोविड सेंटर कडे मुंबईकर संशयाने पाहत असतात.त्याचे कारण सुधा तसेच आहे कारण कोरोंनाच्या तिसऱ्या लाटेची आवई गेल्या तीन महिन्यांपासून उठवली जात आहे.मग तिसरी लाट येणार हे ठाऊक असताना मुंबईतील काही कोविड सेंटर बंद का केले? त्याच कोविड सेंटर मध्ये अनेक त्या सुधारणा करून त्यांनाच अत्याधुनिक आणि सुरक्षित का बनवले नाही असा सवाल मुंबईकर करीत आहेत.जुने कोविड सेंटर बंद करणे आणि नवे सुरू करणे या दरम्यान किती आणि कसे झोल झटपट होतात याची आता मुंबईकरांना चांगलीच कल्पना आहे .रेस्कोरस वरच्या ४४कोटींच्या नव्या नियोजित कोविड सेंटर मध्ये पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनातील अधिकारी आदी मिळून किती लाभार्थी आहेत याची चौकशी व्हायला हवी .कारण हा सगळा पैसा मुंबईकरांचा आहे तो अशा प्रकारच्या उधळपट्टी साठी नाही .तिसऱ्या लाटेबद्दल सर्व काही ठाऊक असताना जुने कोविड सेंटर बंदच का केले? आणि त्याऐवजी आता नवे जंबो कोविड सेंटर का बांधले जात आहे.याची चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी मुंबईकर जनता करीत आहेत.आदरणीय पंतप्रधान मोदी यांनी चांगल्या आणि शुध्द हेतूने संकटात संधी शोध असा उपदेश केला होता पण पालिकेतील भ्रष्टाचारी लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ लावून आपल्या फायद्यासाठी पालिकेच्या तिजोरीवर दरोडा घालणे आणि कोरोंनाच्या संकटात मुंबईकरांचा गैरफायदा घेणे म्हणजे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खण्यासारखे आहे अशी संतप्त प्रतिक्रिया मुंबईकर व्यक्त करीत आहेत

error: Content is protected !!