मुंबई/ सुरू आहेत दारूचे बार मंदिराचे कधी उघडेल दार–मंदिरे उघडण्यासाठी भाविकांचे राज्यभर तीव्र आंदोलन भाजपच्या शंख नादाने सरकार अस्वस्थ
उधवा अजब तुझे सरकार!
कोरोंनाच्या भीतीने गेले वर्षभर बंद असलेली मंदिरे आता तरी उघडा या मागणीसाठी भाजपने काल संपूर्ण महाराष्ट्रात जे आंदोलन केलं .त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला .या आंदोलनामुळे सरकार अस्वस्थ झाले असून मंदिरे खुली करण्या बाबत लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे
काल महाराष्ट्रातील सर्व प्रमुख मंदिरांच्या समोर भाजपचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी जमले आणि त्यांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना अडवले मुंबईत झालेल्या आंदोलनात भाजपचे जेष्ठ नेते सुधीर भाऊ मुनगंटीवार सामील झाले होते यावेळी पोलिसांनी सिद्धिविनायक मंदिर,मुंबादेवी,महालक्ष्मी , वडाळा येथील विठ्ठल मंदिर कांदिवली येथील साई धाम आदी ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले आणि मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना अडवले यावेळी काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.पुण्यात कसबा गणपती जवळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आंदोलन केले यावेळी ते म्हणाले की मंदिरे गेले वर्षभर बंद असल्याने भाविकांमध्ये संताप आहे.आम्ही सर्व नियम पाळून मंदिरात जाण्यासाठी तयार असताना सरकार आम्हाला का रोखतेय मंदिरे बंद असल्याने या मंदिरांवर रोजीरोटी अवलंबून असलेल्या अनेकांवर उपासमारीची पाळी आली आहे त्यामुळे सरकारने मंदिरे ताबडतोब खुली करावीत अशी त्यांनी मागणी केली त्याच बरोबर इतर राज्यांमधील मंदिरे खुली आहेत मग महाराष्ट्रातच मंदिरे बंद का ? असा सवाल करीत आमचे हे आंदोलन सर्व धर्मियांच्या धार्मिक स्थलांसाठी असल्याचे सांगितले शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात साई मंदिराजवळ आंदोलन करण्यात आले .या आंदोलनात मोठ्या संख्येने साईभक्त सामील झाले होते.नाशिकच्या काळाराम मंदिर तसेच शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिराजवळ भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर येथे मात्र आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही तर औरंगाबादमध्ये एका मंदिरात मागच्या दाराने घुसलेल्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.विदर्भातील नागपूर,अमरावती,वर्धा,बुलढाणा,चंद्रपूर आदी ठिकाणी झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने भाविक सामील झाले होते आणि सरकार विरूद्ध घोषणा देत होते तसेच मंदिरांच्या समोर शंखनाद करीत होता सकाळच्या वेळेस झालेल्या या शंख नादाने राज्यातील अनेक मंदिरांच्या समोरील वातावरण दुमदुमले होते .आता या आंदोलनाची सरकारला दखल घेऊन मंदिरे खुली करावीच लागतील असे भाजप नेत्यांनी सांगितले
बॉक्स/ अण्णा हजारेंचा पाठींबा पण सहभाग नाही
भाजपच्या शंखनाद आंदोलनाला अण्णा हजारे यांनी पाठींबा दिला होता पण ते आंदोलनात सहभागी झाले नाहीत त्यांच्या राळेगण सिधी मध्येही आंदोलन झाले नाही आपण मंदिरातून घडलो त्यामुळे मंदिरे उघडण्यासाठी झालेल्या आंदोलनास आपला पाठींबा आहे असे अण्णा म्हणाले होते