दहीहंडी म्हणजे स्वातंत्र्य युद्ध नाही -मुख्यमंत्री
मुंबई -आम्ही हिंदूंच्या सनाविरुद्ध आहोत असा कांगावा करून दहीहंडीसाठी आंदोलन करणार्यांना हे कळलं हवे होते की दहीहंडी म्हणजे काही स्वांतत्र्य युद्ध नाही की जे मिळायलाच हवे असे नाही आणि आदोंलणेच करायची असतील तर कोरोंनाच्या विरूढ आंदोलन करा . यात्रा काढून आणि बोंबलून जन आशीर्वाद मिळणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे व भाजपला सुनावले आहे . ठाण्याच्या संस्कृती युवा प्रतिष्ठाणच्या वतीने ऑक्सीजन प्लांटचे लोकपर्ण ऑन लाइन पद्धतीने करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री बोलत होते .यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ,संजय राऊत रवींद्र फाटक ,महापौर नरेश म्हसके आणि संस्कृती प्रतिष्ठानचे आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते . मुख्यमंत्री ठाकरे यांनी दहीहंडीसाठी आंदोलन करणार्यांना खडे बोल सुनावत संगितले की गणेशोत्सव आणि दहीहंडी सारखे उत्सव साजरे करताना काळजी घ्या गर्दी व्हायला देऊ नका असे आम्हाला केंद्रानेच पत्र पाठवले आहे .त्याचे आम्ही पालन करतोय .शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धोरणाला सुरूवातीपासून बांधील आहे .म्हणूनच आम्ही समाज कारणाला अधिक महत्व देतो .टास्क फोर्स आणि इतर तज्ञ तिसर्या लाटेचा धोका आहे असे सांगत असताना जे लोक यात्रा करून गर्दी जमवत आहेत .त्यांना फक्त राजकारण कारचे आहे असेही ते म्हणाले .