ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

रायगड भुषण किशोर गायकवाड यांचा वाढदिवशी सीसीटीव्ही कॅमेराचे उद्घाटन; दिग्गजांची उपस्थितीती! सामाजिक क्षेत्रात गायकवाड यांचा ठसा!

कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील डिकसल येथिल सामाजिक कार्यकर्ते तथा रिपाइं (आठवले) गटाचे तालुका उपाध्यक्ष यांचा वाढदिवशी डिकसल परिसरात सीसीटीव्ही कॅमेराचे उद्घाटन रिपाइंचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख तथा पत्रकार धर्मानंद गायकवाड यांचा हस्ते पार पडले आहे. यावेळी या वाढदिवसा निमित्त लहानशा चिमुकल्याचा जीवावर उदार होवुन जीव वाचविणारे शुरवीर मयुर शेळके याचा तसेच नेरळचे नवनिर्वाचित पोलिस अधिकारी राजेंद्र तेंडुलकर यांचा सन्मान या वाढदिवशी करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहीती अशी की, कर्जत डिकसल येथिल सामाजिक कार्यकर्ते किशोर गायकवाड यांचा सामाजिक कार्यात मोठा गवगवा आहे. गायकवाड यांचा सामाजिक कार्याची दखल घेवुन रायगड जिल्हा परीषदेने किशोर गायकवाड यांना रायगड भुषण पुरस्कार देवुन सन्मानित केले आहे. त्यामुंळे रायगड भुषण पुरस्काराने सन्मानित असणाऱ्या किशोर गायकवाड यांचा आज वाढदिवस असल्साने त्यांचा वाढदिवसानिमित्त आज कर्जत शांतीनगर येथे गुणवंतांचा सत्कार आणि सीसीटीव्ही कॅमेराचे उद्धाटन करण्यात आले आहे. त्यामुळे येथे गुन्हेगारांचा वावर राहणार नसुन या सीसीटीव्हीमुळे पोलिसांनाही मदत होणार असल्याने शांतीदुत मंडळाचा या उपक्रमाचे नेरळचे पोलिस अधिकारी श्री. राजेंद्र तंडुंलकर यांनी जाहीर कौतुक केले आहे.
यावेळी या सीसीटीव्हीचे उद्घाटन रायगड जिल्हा रिपाइंचे संपर्क प्रमुख तथा नेरळ ग्रामपंचायतीचे सदस्य, पत्रकार धर्मानंद गायकवाड यांचा हस्ते करण्यात आले आहे. या प्रसंगी रिपाइंचे कोकण नेते मारुतीदादा गायकवाड, नेरळचे पोलिस अधिकारी राजेंद्र तंडुलकर, राष्ट्रवादीचे युवा नेते सागर शेळके, माजी सरपंच समिर साळोखे, कर्जतचा नगरसेविका वैशाली मोरे, रिपाइंचे कर्जत शहरअध्यक्ष अरविंद मोरे, माजी नगरसेवक दिपक मोरे, रिपाइचे युवा नेते सचिन भालेराव, सौ. दिपाली पाटील, कार्याध्यक्ष दिनेश गायकवाड, उपाध्यक्ष भालचद्रं गायकवाड, डॅा. पाटील, विद्यार्थी परीषदेचे जिल्हा अध्यक्ष तसेच या कार्यक्रमाचे मु्ख्य आयोजक उत्तमराव गायकवाड, सचिन गायकवाड, दिपक गायकवाड, यासंह पत्रकार संतोष पेरणे, दिपक पाटील, जयवंत हाबळे, कांता हाबळे, गणेश पवार, गणेश मते, यांसह अनेक विविघ क्षेत्रातील मान्यवर व रिपाइंचे पदाधिकारी उपस्थितीत होते.
दरम्यान आज सकाळ तुफान पाऊस कोसळत असतानाही रायगड भुषण यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी डिकसल शांतीनगरमध्ये आपल्या लाडक्या मित्राला शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती. कार्यक्रमाचा सुरुवातीलाच संविधान कोकण नेते मारुतीदादा गायकवाड व शुरवीर मयुर शेळके यांचा हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येवुन त्यानंतर रासदड जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड यांचा हस्ते या सीसीटीव्ही कॅमेराचा उद्घाटन सोहळा पार पडला आहे. यावेळी विविघ मान्यवरांचा हस्ते हस्ते नारळ वाढविण्यात आले आहे.
रायगड भुषण किशोर गायकवाड यांचा वाढदिवसानिमित्त या सीसीटीव्ही कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया (आ.) शाखा डिकसळ यांचा वतीने करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी राजिविपचे जिल्हा अध्यक्ष ॲड. उत्तम गायकवाड, शांतीदुत मंडळांचे अध्यक्ष निखिल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते जिवक गायकवाड यासंह रिपाइंचे शाखा अध्यक्ष मदन हिरे, कार्याध्यक्ष मनोज गायकवाड, उपाध्यक्ष रविंद्र पिंपळे, सिंचन प्रशिक गायकवाड, उपसचिव गोवर्धन सोनावणे, संघटक शांताराम भोईर, शैलेश हिरे, तेजस हिरे, अजिंक्य हिरे यांसह अनेकांनी मेहनत घेतली होती. यावेळी या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ॲड. उत्तम गायकवाड यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत रिपाइं शाखा डिकसलचा वतीने करण्यात आले आहे. सीसीटीव्हीचे उद्घाटन करुन आपणास शुभेच्छा दिल्याबद्दल रासदड भुषण किशोर गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले आहे.


कर्जत तालुक्यांतील डिकसल येथिल सामाजिक कार्यकर्ते रायगड भुषण किशोर गायकवाड यांचा वाढदिवशी आज सीसीटीव्ही कॅमेराचे उद्घाटन रिपाइंचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख तथा पत्रकार धर्मानंद गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आल्याचे छायाचित्रांत दिसत असुन सोबत शुरवीर मयुर शेळके, रिपाइचे कोकण नेते मारुतीदादा गायकवाड, राष्ट्रवादीचे युवक नेते सागर शेळके, नेरळचे पोलिस निरीक्षक श्री. राजेंद्र तेंडुलकर पहील्या छायाचित्रांत दिसत असुन दुसऱ्या छायाचित्रांत अन्य मान्यवर उद्घाटन प्रसंगी दिसत आहे

error: Content is protected !!