ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आणि आठवलेही वानखेडे यांच्या पाठीशी

नवाब मलिक यांच्यावर कारवाई होणार?
मुंबई/ एन सी बी ने क्रुझ वर टाकलेल्या धाडीच्या नंतर नवाब मलिक यांनी या धडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून एन सी बी चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरूद्ध अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी जी बदनामीची मोहीम सुरू केली आहे त्याविरुद्ध वानखेडे कुटुंबीयांनी मागासवर्ग आयोग आणि रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांच्याकडे न्यायासाठी दाद मागितली होती . त्यानंतर या दोघांनीही वानखेडे कुटुंबीयांना पाठींबा दर्शवला असून या प्रकरणी आठवले अमित शहांची तर मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर हे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कारवाईची मागणी करणार आहेत . त्यामुळे नवाब मलिक यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे .
काल वानखेडे कुटुंबीयांनी मुंबईत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि आपल्याकडचे सर्व कागदपत्र आठवलेंना दाखवले त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी वानखेडे हे कधीच मुस्लिम नव्हते ते आंबेडकरवादी आहेत आणि त्यांची सर्व कागदपत्रे तपासून आपण तशी खात्री पटवून घेतलीय नवाब मलिक च्या जावायावर झालेल्या कारवाईमुळे ते वानखेडे कुटुंबावर खोटेनाटे आरोप करीत आहेत .मात्र मी आणि माझा पक्ष ठामपणे त्यांच्या पाठीशी आहोत असे सांगितले या पत्रकार परिषदेत क्रांती रेडकर म्हणाल्या की मलिक रोज उठून आमची बदनामी करीत आहेत याच्या बायकोची जात कुठली त्याच्या बायकोची जात कुठली असे सांगून असे सांगून आमचे फोटो व्हायरल करीत आहेत त्यांना कोण काही प्रश्न विचारत नाही . त्यांच्या मागे कॅमेरे घेऊन फिरतात आणि आम्हाला प्रश्न विचारतात एन सी बी चां कारवाईचा आणि आमच्या जातीचा काय संबंध असा सवाल त्यांनी मिडीयाला केला तर समोरच्या वडिलांनी आपण हिंदू असल्याची सर्व कागदपत्रे मिडीयाला दाखवून मलिक हा जर भांगर्वला आहे तर त्याचे नाव नवाब कसे आणि तो इतका करोडपती कसा असा सवाल केला तर त्यानंतर मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हल्डार यांनी वानमवेडेच्या घरी जाऊन सर्व माहिती घेतली तसेच त्यांची जातीची प्रमाणपत्र तपासून ते दलीत असल्याचेच सांगितले . या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांना भेटून कारवाईची मागणी करणार असल्याचे सांगितले त्यामुळं आता मलिक यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे .

error: Content is protected !!