ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिका

पालिका अधिकाऱ्यांमुळे फेरीवाल्यांच्या दिवाळीला चार चांद! -ग्रँट रोड आणि फॅशन स्ट्रीट वर नियमांची पायमल्ली-अतिक्रमण निर्मूलन खात्याचा आशीर्वाद

मुंबई/ अतिक्रमण करणाऱ्या झोपडपट्टी वासियानी ज्याप्रमाणे मुंबईतील फुटपाथ व्यापल्या आहेत . त्याच प्रमाणे फेरीवाल्यांनी सुधा आपल्या मालाचा बाजार मांडून अर्धे रस्ते व्यापले आहेत ग्रँट रोड मध्ये जे छोटे स्टॉल वाले आहेत त्यांनी स्टॉलचा बाहेर खोके टाकून अर्धे रस्ते अडवले आहेत त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या लगतचे रस्ते असोत की डी बी मार्ग पोलिस स्टेशन समोरचा फूटपाथ ‘ शालिमार सिनेमा जवळची फुटपाथ असो जणू काही ती फेरीवाल्यांच्या नावावर करण्यात आली आहे. याला जबाबदार आहेत अर्थातच पालिका अधिकारी .फेरीवाल्यंकडून त्यांना हप्ते मिळतात असे बोलले जाते .त्यामुळे च स्टॉल वाले बेधडक स्टॉल चां बाहेर बाहेर माळ लावून जाणाऱ्या येणाऱ्यांची गैरसोय करतात असा आरोप इथल्या लोकांनी केलाय तर फॅशन स्ट्रीट वर जवळपास ४५० स्टॉल वाले धंदा करतात पण त्यांनी पालिकेचे सर्व नियम पायदळी तुडवून आपला धंदा सुरू ठेवलेला आहे . तिथे ज्या मालाची विक्री केली जाते तो माल विकण्याची परवानगी आहे का ? तसेच स्टॉलची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून आता स्टॉलच्या समोर फुटपाथवर समोरासमोर स्टॉल लावून अतिक्रमण केले जाते याचीही चौकशी व्हायला हवी अशी मागणी येथे खरेदीसाठी येणारे लोक करीत आहेत . हे सगळ डी वार्ड आणि ए वार्ड पालिका अतिक्रमण निर्मूलन आणि स्टॉल परवाना देणाऱ्याअधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप केला जातोय त्यामुळे आता पालिका आयुक्तांनी याची दखल घेऊन हे सगळ बंद करावं अशी मागणी होतेय .

error: Content is protected !!