ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

झुलता पूल नदीत कोसळून ५२ ठार

मोरबी/ गुजरात मधील मोर्बी येथे मछु नदीवरील झुलता पूल नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 52 जणांचा मृत्यू झाला तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत . 70 लोकांना नदीच्या पाण्यातून बाहेर कडून वाचवण्यात बचाव पथकाला यश आले.
सध्या दिवाळीची सुट्टी असल्याने लोक पर्यटनासाठी घराबाहेर पडतात मोराबि मधील झुलता पूल हा सुधा पर्यटकांचे आकर्षण आहे मात्र हा पूल काही काळ दुरुस्तीसाठी बंद होता पण 5 दिवसांपूर्वी तो खुला करण्यात आला .त्यामुळे काल रविवारी मोठ्या संख्येने लोक या पुलावर जमले पण गर्दी वाढल्याने पूल तुटला आणि 500 हून अधिक लोक खाली नदीच्या पाण्यात पडले त्यामुळे एकच खळबळ माजली त्यानंतर पोलीस आणि बचाव पथकाने स्थानिकांच्या मदतीने 70 लोकांना नदीच्या पाण्यातून बाहेर काढले तर 52 मृतदेह हाती लागले असून अजून काही लोक बेपत्ता आहेत . दरम्यान या दुर्घटनेतील मृतांना 2 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत सारखा4ने जाहीर केली आहे .

error: Content is protected !!