साईली प्रशांत भाटकर यांचा सन्मान
पनवेल महानगरपालिका स्वीप-2021 च्या उत्सव मतदार साक्षरता नोंदणी व जनजागृती अभियानाअंतर्गत, विषयाच्या अनुशंगाने मतदार नोंदणीविषयी जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम, चर्चासत्र, जिंगल मेकिंग, अशा सामाजिक संदेश देणाऱ्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा बक्षिस वितरण सोहळा 30 डिसेंबर 2021 रोजी आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात संपन्न झाला.
मराठी कलाकारांचे या जनजागृतीविषयीच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्वदेशी तुझे सलामने पनवेल महानगरपालिकेच्या या अभियानासाठी आपले महत्वपूर्ण डिजीटल व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. या कार्यासाठी स्वदेशी तुझे सलामच्या साईली प्रशांत भाटकर यांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या आयोजित या बक्षीस वितरण सोहळ्याला पालिकेचे उपआयुक्त (मुख्यालय) डाके, सहाय्यक आयुक्त श्रीमती. वंदना गुळवे, अतिरिक्त आयुक्त श्रीमती. तृप्ती सांडभोर, उपआयुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त श्रीमती. सुवर्णा दखने, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, निवडणूक विभागप्रमुख श्री सदाशिव कवठे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ उपस्थित होते. तसेच या संपूर्ण अभियानाची संकल्पनेची रचना आणि मार्गदर्शन हे पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी केले.
याप्रसंगी पनवेल महानगर पालिकेचे उपआयुक्त विठ्ठल डाके यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले “तुम्ही नोटाला मतदान केलेत तरी निवडणुक आयोगाची काही हरकत नसते तो मतदाराचा वैयक्तिक प्रश्न असतो, परंतु मतदानाचा हक्क न बजावता, मतदार यादीत नावनोंदणी न करता, सरकारवर टीकेचे ताशेरे ओढण्याचा कोणालाही हक्क नाही. तुम्ही जर मतदान करत असाल, मतदार यादीत तुमचे नाव असेल, तरचं तुम्हाला सरकार निवडण्याचा तसेच निवडणूकीत मतदानाद्वारे निवडून आलेल्या सरकारच्या कार्याविषयी बोलण्याचा अधिकार असतो. त्यामुळे देशाचे एक सुजाण नागरिक म्हणून आणि सुयोग्य उमेदवार निवडून सरकार निर्मितीमध्ये सहभागी होणे आपले कर्तव्य आहे आणि ते सर्वांनी बजावले पाहिजे.”
कोविड काळात भारतीय अर्थव्यवस्थेला अप्रत्यक्षरित्या अर्थसहाय्य म्हणून, रोजच्या वापरात जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन स्वदेशी तुझे सलाम सातत्याने डिजीटल माध्यमातून करत असते. साईली भाटकर, सुजित विजयन, पुजा डांगे, अक्षय लुडबे ही टीम स्वदेशी तुझे सलामच्या माध्यमातून जनजागृतीविषयी अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते.