ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मोदींच्या विरुद्ध लोकांमध्ये रोष – शरद पवारांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

अलिबाग – देशात आणि राज्यात मोदींना विरोध वाढत आहे, लोकांना मोदी नको आहेत, बदल हवा आहे, त्यामुळेच आता भाजपकडून हिंदू मुस्लिम असा वाद निर्माण केला जातोय अशी टीका शरद पवार यांनी केली. सोमवारी मोदींनी केलेलं भाषणं लाज वाटण्यासारखं होतं, ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि ते एका समाजाबाबत इतकं वाईट बोलतात, त्यामुळं देशात विद्वेष वाढेल अशी परिस्थिती आहे असंही शरद पवार म्हणाले. रायगडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अंनत गिते यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.
महागाईचा सर्वात मोठा प्रश्न लोकांसमोर आहे. नरेंद्र मोदी म्हणाले होते की सहा महिन्यात महागाई दूर करतो. परंतु आज परिस्थिती जैसे थे आहे. गॅसची किंमत वाढली आहे. मोदी यांच्या 10 वर्षांच्या काळात अजूनही महागाई तशीच आहे. जगात मोठी एक संस्था आहे त्याने बेकारीचा अभ्यास केला त्यात 86 टक्के तरूण बेरोजगार आहेत. मग मोदींची काय गॅरंटी आहे?
देशात लोकशाही टिकवण गरजेचं आहे. पाकिस्तानमध्ये लोकशाही होती त्या ठिकाणी लष्कराने देश हातात घेतला आणि त्यामुळं तिथं हुकूमशाही आली. बांगलादेशमध्ये, श्रीलंकेमध्ये तेच झालं. तिथं देखील हुकूमशही आली.रशियामध्ये पुतीनमुळे लोकशाही नाहीशी झाली. आता आपल्या देशात मोदी पुतीन होत आहेत. त्यामुळं लोकशाही जाऊन हुकूमशाही येईल
झारखंडमध्ये मुख्यमंत्र्यांनी मोदीच्या विरोधात टीका केली. आज त्या राज्याचा मुख्यमंत्री जेलमध्ये आहे. मला या ठिकाणी आपचे लोक दिसत आहेत. दिल्लीत आपने केंद्रीय यंत्रणेच्या विरोधात भूमिका घेतली. आज त्या राज्याचे मुख्यमंत्री जेलमध्ये आहेत. अरविंद केजरीवाल यांनी मोदींच्या विरोधात मत व्यक्त केली. त्याचा परिणाम त्यांना जेलमध्ये जावं लागलं. त्यांनी काय खावं आणि काय खाऊ नये यावर लक्ष ठेवलं जात आहे. या सगळ्या गोष्टी दिल्लीत घराघरात जात आहेत.


error: Content is protected !!