देशात 62.32% तर महाराष्ट्रात 49 .०१ टक्के मतदान – संथ गतीच्या मतदानामुळे मतदारांच्या लांबच लांब रांगा
सायन आणि कुलाब्यात भाजपा व काँग्रेसमध्ये राडेबाजी
मुंबई/आज लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यात 49.०१ टक्के मतदान तर देशात ६१.३२ टक्के मतदान झाले.
आज सकाळपासून मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या पण निवडणूक अधिकारी जाणून बुजून टाईमपास करीत होते.कोणाचा ऍड्रेस बरोबर नाही तर कोणाचा फोटो बरोबर नाही अशी कारणे सांगत होते त्यामुळे मतदानाल उशिर लागत होता.परिणामी काही मतदार कंटाळून मतदान न करताच घरी जात होते.त्यामुळेच महाराष्ट्रात मतदानाचा टक्का घसरला
मतदानाची टक्केवारी
भिवंडी…48.89 टक्के
धुळे….48.81
कल्याण..,.41.71
दिंडोरी….57.06
उत्तर मुंबई…..46.91
उत्तर मध्य मुंबई….47.32
उत्तर पूर्व मुंबई….48.67
उत्तर पश्चिम मुंबई…49.79
दक्षिण मुंबई….44.22
दक्षिण मध्य मुंबई…48.26
नाशिक….51.16
पालघर.,..53.32
ठाणे…..45.38
देशात 61.32 टक्के मतदान झाले सर्वाधिक मतदान पश्चिम बंगाल मध्ये 73.14 टक्के झाले तर सर्वात कमी मतदान बिहार मध्ये 43.12 टक्के इतका झाले
दरम्यान काल मतदानाच्या दिवशी पोलिंग बूठच्या जागेवरून सायन मध्ये काँग्रेस व भाजपा कार्यकर्त्या मध्ये हाणामारी झाल्याचे समजते यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी धमकी दिल्याची फिर्याद भाजपने नोंदवली तर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने भाजप विरुद्ध फिर्याद नोंदवली कुलाब्यातील एक मतदान केंद्रावर आलेल्या राहुल नार्वेकर यांच्या विरोधात ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी 50 खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या त्या मुळे नार्वेकर समर्थक व शिवसैनिक मध्ये बाचाबाची झाल्याचे समजते