ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

लोकल ट्रेन चां निर्णय दोन दिवसात

२५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार; आता शनिवारीही दुकाने उघडण्यास परवानगी

मुंबई/ करोंनाचे कारण पुढे करून राज्य सरकारने जे कठोर निर्बंध लादले आहेत ते आता शिथिल करण्याचा निर्णय घेतला असून तब्बल २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल केले जाणार आहेत तर जिथे करोंना पॉजिटिव रेट अधिक आहे अशा ११जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या फेज मधील निर्बंध कायम असतील दरम्यान लोकल ट्रेन सुरु करण्याबाबतचा निर्णय दोन दिवसात मुख्यमंत्री जाहीर करणार आहेत
महाराष्ट्रात जे कठोर निर्बंध सुरू आहेत त्यामुळे जनतेमध्ये प्रचड असंतोष आहे खास करून लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू केली जात नसल्याने प्रवासी संघटना रस्त्यावर उतरली आहे आणि वीना तिकीट लोकल प्रवास करीत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्टाक्स फोर्स मधील डॉकटर आणि आरोग्य अधिकारी यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत निर्बंध शिथिल करण्याबाबत तसेच लोकल सुरू करण्याबाबत चर्चा झाली. यावेळी काही डॉक्टरांनी १५ऑगस्ट पर्यंत वाट बघा असे सांगितले पण जनतेचा संयम सुटून काहीतरी अघटीत घडू शकेल याची भीती सरकारला होती. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये करोंना पॉजिटिव रेट कमी आहे अशा जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले. यात मुंबई,ठाणे, नागपूर,औरंगाबाद, लातूर ,उस्मानाबाद, जळगाव, गडचिरोली,धुळे,यवतमाळ,परभणी,अकोला,अमरावती ,भंडारा,चंद्रपूर,नांदेड,बुलढाणा,वाशिम नंदुरबार आदी २५ जिल्ह्यांचा समावेश आहे .येथील दुकाने आता शनिवारी सुधा सुरू राहतील तर ज्यांचा पॉजिटिव रेट ३पेक्षा अधिक आहे .अशा पालघर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,अहमदनगर,पुणे,सांगली,सोलापूर,कोल्हापूर,सातारा,बीड या जिल्ह्यातील निर्बंध कायम राहणार आहेत
दरम्यान लोकल ट्रेन सुरु करण्याच्या वादग्रस्त मुद्द्यावर एकमत होऊ शकले नाही त्यामुळे आता मुख्यमंत्री स्वतःच येत्या दोन दिवसात निर्णय घेणार आहेत

टास्क फोर्स लोकांच्या जीवावर उठली आहे

मुंबईतील लोकल ट्रेन ही मुंबईकरांची जीवनवाहिनी असून रोज ७६ लाख प्रवासी यातून प्रवास करतात पण सर्वसामान्य लोकांना लोकल ट्रेन बंद असल्याने त्यांना एस ती मधून रोज सह तास प्रवास करावा लागतो त्यामुळे लोक चिडले आणि लोकल तीन सर्वसामान्य जनतेला खुली कराशी मागणी करीत आहे पण लोकांच्या या हाल अपेष्टा दिसत असतानाही टास्क फोर्स चे डॉकटर लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू करायला विरोध करीत आहेत जणू काही ते लोकांच्या जीवावरच उठलेत

error: Content is protected !!