ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

रिंगण अंकासाठी तुमची मदत हवीय

आम्ही नियमितपणे पाळला तो अनियमितपणाच, हे पुलंचं वाक्य कॉलेजात असताना वाचलं, तेव्हा वाटलं हे आपल्यासाठीच. आयुष्यात त्याला अपवाद ठरलं ते फक्त रिंगण. यंदा संत चांगदेव विशेषांक हा रिंगणचा बारावा अंक. २०१२च्या आषाढीला पहिला अंक आला. पैसे नव्हते म्हणून २०१३ला अंक आला नाही. नंतर मात्र दर आषाढी एकादशीला सलग अंक येतो आहे.

रिंगणची सुरवात केली, तेव्हा अशाच प्रोजेक्टमधून चरितार्थ चालावा, असा विचार होता. पण पांडुरंगाने त्याची आवश्यकताच ठेवली नाही. त्याने आजवर माझ्या पोटापाण्याची काळजी घेतलीय. नोकरी न करताही इतर कामं कधीही कमी पडू दिली नाहीत. आणखी काय लागतं जगायला? त्यामुळे मग रिंगणमधून येणारे पैसे रिंगणसाठीच वापरायचं पक्कं होत गेलं.

ही हिंमत मला तुम्ही वाचकांनीच दिली. तुम्हीच माझा पांडुरंग बनलात. प्रत्येक अंकासाठी तुम्ही अभंगदूत बनून ₹१००० किंवा त्याच्या पटीत पाठवत आलात. रिंगणची जबाबदारी तुम्हीच घेतली. यंदाही तुमच्यासमोर हात पसरून रिंगणसाठी मदत मागतो आहे. रिंगणला गुगलपे, फोनपे, भीम यापैकी कशानेही मदत पाठवण्यासाठी नंबर आहे,

9920839805

या नंबरवर ₹१००० किंवा कितीही रक्कम पाठवा, ही नम्र विनंती. तुम्ही आहात, म्हणून रिंगण आहे, हे मला माहीत आहे.

सचिन परब I रिंगणचा संपादक I ९९८७०३६८०५ I ९४२०६८५१८३ I

(रिंगण हा दरवर्षी एका संताविषयी समग्र मांडणी करू पाहणारा वार्षिक अंक आषाढी एकादशीला प्रकाशित होतो. यंदाचा अंक संत चांगदेवांवर आहे.)

error: Content is protected !!