ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

अपात्र ठरली सुवर्णपदक गमावले – पण १४० कोटी भारतीयांचे मन विनेशनी जिंकले


पॅरिस – तीन पहिलवानांना चितपट करून फायनल मध्ये पोचलेली भारताची स्टार कुस्तीगीर विनेश फोगट हिचे अंतिम फेरीत वजन वाढल्याने तिला अपात्र पॅरिस ऑलिम्पिकच्या १२व्या दिवशी भारताला सर्वात मोठा धक्का बसला. भारताची सुवर्णपदकाची दावेदार असणाऱ्या विनेश फोगटला अतिरिक्त वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून अपात्र ठरवण्यात आले आहे. यासह भारताचे अजून एक पदक हुकले.
दरम्यान आज लोकसभा अधिवेशनातही विनेशच्या पराभवावरून खडाजंगी बघायला मिळाली याशिवाय भारतीय महिला टेबल टेनिस संघाला जर्मन संघाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर रात्री उशिरा मीराबाई चानूही वेटलिफ्टिंगच्या पदक स्पर्धेत सहभागी होणार आहे. तर भारताचा धावपटू अविनाश साबळे आज ३ हजार मी. अडथळा शर्यतीत सहभागी होणार आहे. तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये २ कांस्यपदक जिंकणारी स्टार नेमबाज मनू भाकेर देशात परतली असून विमानतळावर चाहत्यांनी तिचे जल्लोषात स्वागत केले.

error: Content is protected !!