महायुतीच्या नेत्यांना अडकवण्यासाठी पवार – ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठका ! माजी पोलीस आयुक्तांचा आरोप
मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार असताना शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली मातोश्री , सिल्व्हर ओक या ठिकाणी बैठका झाल्या आणि या बैठकांमध्ये देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर , गिरीश महाजन यांना कोणत्या गुन्ह्यात कसे तक्ता येईल यावर चर्चा झाल्या असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला आहे
माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी वसुलीचा केलेला आरोप खरा असल्याचे म्हटलं आहे. परमवीर सिंग यांनी आज अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांनी केलेल्या आरोपानंतर आज एबीपी माझाशी बोलताना देशमुखांवरील आरोपांचा पुनरुच्चार केला. सुशांत सिंह प्रकरणामध्ये बॉलिवूडवर दबाव टाकण्यात सांगण्यात आल्याचा आरोप सुद्धा सिंग यांनी केला. दरम्यान, परमवीर सिंग यांनी थेट मातोश्री आणि सिल्वर ओकचा उल्लेख करत या प्रकरणामध्ये अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचाही सहभाग असल्याचा आरोप केला. त्यामुळे या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा आरोपांची मालिका होण्याची शक्यता आहे. परमवीर सिंग यांनी गुन्हे दाखल करणारे सूत्रधार अनिल देशमुख असले, तरी त्यांच्या मागे पवार-ठाकरे असल्याचा खळबळजनक आरोप केला. परमवीर सिंह यांनी सलील देशमुख (अनिल देशमुख यांचे चिरंजीव) हॉटेल ललितमध्ये बसून डील करत होते, असा आरोप केला. ते म्हणाले की पोलिसांच्या बदल्यांसाठी अनिल देशमुख यांनी शेरा मारलेली पत्र माझ्याकडे आहेत. महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये विरोधी नेत्यांना अडकवण्यासाठी दबाव आला होता असा सुद्धा आरोप परमवीर सिंह यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.