लाडकी बहीण योजनेला ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सध्या प्रचंड प्रतिसाद मिळत आहे मात्र या योजनेसाठी अर्ज भरण्याची अखेरची तारीख ३१ ऑगस्ट होती त्यामुळे ज्या महिलांना अर्ज करत आला नाही त्या नाराज होत्या व अर्ज भरण्याची मुदत वाढवावी अशी मागणी करीत होत्या त्यानुसार आता ला डकी बहीण योजनेला ३० सप्टेंबर पर्यंत म्हणजे १ महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेलाराज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळत असून गावखेड्यात कोट्यवधी महिलांना योजनेसाठी आपले अर्ज भरले आहेत. विशेष म्हणजे महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यासही सुरुवात झाली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही मिळून महिलांना 3 हजार रुपये मिळत आहे. रक्षाबंधन सणापूर्वीच सरकारने महिलांच्या बँक खात्यात 3 हजार रुपये वर्ग केल्यामुळे इतर महिलांचाही मोठा प्रतिसाद योजनेला दिसून येत आहे. यापूर्वी ३१ ऑगस्टपर्यंत योजनेसाठी अर्ज करता येत होता, आता सरकारने ही मुदत आणखी वाढवली असून 30 सप्टेंबरपर्यंत योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना तीन महिन्यांचे एकूण ४५०० रुपये मिळणार आहेत. दरम्यान, जवळपास ४० ते ४२ लाख महिलांच्या बँक खात्याला त्यांचे आधार नंबर लिंक नाही. त्यामुळे या महिलांचा अर्ज मंजूर होऊनदेखील त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे बँक सिडिंगची प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे. एकदा आधार आणि बँक खाते एकमेकांशी लिंक झाले की, या पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल.