ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

तीन वर्षापेक्षा जास्त काळ सेवा झालेल्यांच्या बदल्या करा निवडणूक आयोगाचे आदेश


मुंबई/महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा आता केव्हाही जाहीर होऊ शकतात कारण गेल्या दोन दिवसांपासून निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातल्या परिस्थितीचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. खुद्द निवडणूक आयोग आयुक्त राजू कुमार हे महाराष्ट्रातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे महाराष्ट्रात लवकरात लवकर निवडणूक घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झालेले आहे याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन राज्यातील मतदारांची आकडेवारी सादर केली त्यानुसार राज्यात 4.95 कोटी पुरुष मतदार आहेत तर 4.64 कोटी स्त्री मतदार आहेत तसेच सहा पॉईंट 32 लाख दिव्यांग मतदार आहे तर 597 तृतीयपंथी मतदार आहेत यामध्ये प्रथमच मतदान करणारे 19.48 लाख मतदार आहेत या सर्व बाबी आज निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्या त्याचबरोबर वेगवेगळ्या राजकीय पक्षांची निवडणुकांबाबत चर्चा करून त्यांच्याकडून सूचना मागवल्या या निवडणुकीत मोबाईल हा एक महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे त्यानुसार मतदानासाठी जाताना मोबाईल नेण्यास बंदी आहे जर कोणी मोबाईल घेऊन मतदान केंद्रा परत गेला तर त्याला त्याचा मोबाईल सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली जावी अशी विनंती काही राजकीय पक्षांनी केली होती ती निवडणूक आयोगाने मान्य केली आहे निवडणूक आयोगाच्या वतीने सुविधा पोर्टल नावाचे ॲप जारी करण्यात आले आहे या ॲपवर मतदारांना तक्रार करता येणार आहे एखाद्या ठिकाणी काही घटना घडली किंवा उशिरापर्यंत मतदान सुरू असेल तर त्याचे फोटो काढून या ॲपवर अपलोड केले की 90 मिनिटात निवडणूक आयोगाची तीन तिथे पोहचेल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे एकूणच निवडणूक आयोगाची ही तयारी पाहता पुढील काही दिवसातच महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी निवडणूक तिचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो

error: Content is protected !!