ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

महर्षी दयानंद कॉलेज कला. १९८७/८९ तर्फे कोकण वासियांना मदतीचा हात

मुंबई-(किसन जाधव) नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मध्ये कोकणातील नद्यांना पूर येवून अनेक गावे पाण्याखाली गेली तसेच काही ठिकाणी भूसंकलन होऊन मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी आणि वितहानी झाली त्यामुळे कोकणच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील लाखो लोक विस्थापित झाले आहे. सरकारने त्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले असले तरी आज या विस्थापितांना अंगावरच्या कपड्या खेरीज काहीच राहिलेले नाही .मुंबईत मोठ्या प्रमाणावर कोकणी लोक राहतात .या आपतीमध्ये त्यांच्याही गावी राहणाऱ्या नातेवाईकांचे नुकसान झाले असेल त्यामुळं कोकणातील आपल्या आपतीग्रस्त बांधवांना मदतीचा हात देऊन पुन्हा उभे करण्याची नैतिक जबाबदारी पार पाडण्यासाठी मुंबईतील काही सामाजिक संघटना पुढे आल्या आहेत ॰कोकण सेव्ह -या संघटनेने पुढाकार घेऊन मदतीचे आव्हान केले होते त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक सामाजिक संघटना पुढे आल्या आणि मुंबई व परिसरातील कानाकोपऱ्यातून पूरग्रस्त चिपळूण खेड परिसरातील गावांसाठी मदत साहित्य गोळा केले.सुरवातीला पूरग्रस्त भागाचा दौरा कुठे व किती मदत लागेल आणि ती कशी करता येईल हे पाहून सामनांची यादी करून ही मदतीच्या सामानाचा ट्रक पूरग्रस्त भागाकडे पाठवून मदत वाटप करण्यात आली .ही प्रक्रिया पुढेही सुरू राहणार असून मुंबई तून पूरग्रस्तांसाठी परळच्या महर्षी दयानंद कॉलेज मधील १९८७/८९ चां कालावधीतील कला विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनींचे योगदान आहे. मदत साहित्य मध्ये भांड्याचे नवीन सेट,जेवणासाठी लागणारी भांडी ज्यात ताट वाट्या पासून चहाच्या गळणी पर्यंत चे साहित्य,अर्धा लिटर फिनेल व डेटॉल चां प्रत्येकी बाटल्या,झाडू,सूप,मच्छर कॉईल, टूथ पेस्ट,टूथ ब्रश,आंघोळी व कपडे धुण्याचे साबण खोबरेल तेल,कंगवे, जीवनोपयोगी सामानाचा समावेश होता .इतकेच नव्हे तर पुराच्या पाण्यात घरातले समान आणि कपडेही वाहून गेल्याने मदत साहित्यात महिलांकरिता साड्या,पेटीकोट, मुलांचे कपडे,दूध पाजण्याचा बॉटल्स,दूध पावडर मेडिकल किट आदींचा समावेश होता .०१ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता रोटरी क्लब ऑफ इंडियाच्या टीमने लालबाग इथून सामान टेम्पोने पूरग्रस्त भागाकडे पाठविण्यात आले.

संकल्पना प्र्मुख- सुनील पांचाळ -सामाजिक बांधिलकीचे भान राखून चिपळूण महाडला- मदत पाठवून जे शिवधनुष्य पेलले त्या सर्व मित्रमैत्रिणिंचे मनापासून आभार असेच स्तुत्य उपक्रम आपल्या हातून कोणाच्या हि संकट समयी घडत राहो. आपणही समाजाचे काही देणं लागतो. हाच संदेश मनात ठेवून महर्षि दयानंद क्वालेज कलाविभाग 1987/1989 यांच्या तर्फे एक हात मदतीचा हि संकल्पना राबविण्यात आपण यशस्वी झालोय. या सामाजिक कार्यास वेळोवेळी मदत करणार्यांना सर्व मित्रमैत्रिणिंचे पून्हा एकदा आभार या ऐवजी कर्तव्य ठरते अशीच सेवा आपल्या कडून माणुसकिच्या नात्याने सदैव घडो हिच प्रार्थना.

पूरग्रस्तांसाठी योगदान देणारे प्रशांत भाटकर – नंदू कदम – सुरेखा राणे – प्रदीप राणे – किरण तळेकर- रंजना नागवेकर- संध्या बने- मनीषा फाळके – चंद्रकांत हावळे- उमेश चौधरी – सुनील मेस्त्री – मनिषा भोगले परब – मंगल कुडव – हिंदुराव कांबळे -प्रकाश जाधव – शुभांगी – रचना गोवेकर – विजय पाटील – भारती कानपिले – माधवी कवठणकर – सिताराम चव्हाण – संध्या रामगुडे – भारती हळदणकर- अनिल साळवी – विजय करंगुटकर – संजय रेवडेकर – संजय चव्हाण -संजय मोरे – राकेश बेर्डे – मिनल बागल – अनिता हंचाटे – मिलिंद गावडे -दत्ता राऊत -हरी मर्तल – सुधीर चोरगे -अंजू प्रभू -प्रभाकर मोरे – सुशील शेजवाङकर – नाना पालव – सुभाष डोंगरे -अंकुश फडतरे – वंदना घळसासी – विकास सोनावणे -महेश मोरे- आदेश म्हात्रे -जितेंद्र पुजारी -स्नेहलता गवस आणि संतोष कदम.

error: Content is protected !!